Mumbai Maharashtra News Updates Today, 11 October 2023 : आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण असताना आता हमास आणि इस्रायलमधील युद्धाने आणखी काळजी वाढली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हवाई हल्ले सुरू आहेत. त्यातच जगातील इतर देशाही या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक युद्धाचा भडका उडण्याची भीतीह व्यक्त होत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या मृत्यूप्रकरणी भाजपाच्या चित्रा वाघ यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. गरोदर माता सरकारने दिलेली औषधे आणि पोषण आहार घेत नाहीत. सरकार त्यांना औषधे देऊ शकते, मात्र मिळायला लावू शकत नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. याशिवाय पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर आता मंत्रीमंडळ विस्तारही होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एकूणच महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…
Maharashtra Desh Videsh Updates News in Marathi : राज्यातील राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
अशी घटना घडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातील भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजे. त्यासाठी त्यांनी आग्रह धरला पाहिजे. काही होत नाही. रस्त्यावर उतरलं म्हणून एखादा गुन्हा दाखल करतील, एखादं कलम लावतील. विद्या चव्हाण यांचं रेकॉर्ड तपासलं तर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले लक्षात येईल. हे सर्व गुन्हे लोकांच्या प्रश्नासाठी दाखल होतात. त्यामुळे त्याची काही चिंता करायची नसते. कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक येतात आणि त्यावेळी आम्ही हे गुन्हे काढून टाकतो. त्यामुळे या गुन्ह्यांची काही चिंता करू नका. रास्त प्रश्नांवर रस्त्यावर येणं हा आपला हक्का आहे, ही भूमिका समजून घेतली पाहिजे.
- शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
नवी मुंबई : हेल्मेट न वापरल्याने अपघातांत मरण पावणाऱ्यांची दुचाकीस्वारांचे प्रमाण खूप असल्यामुळे हेल्मेटसक्ती असली तरी अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट सुसाट वाहने चालवत आहेत. नवी मुंबई आरटीओने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत तब्बल २ हजारांहून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली असून १ हजार ७६ व्यक्तींचे परवाने निलंबित केले आहेत.
दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एका शिक्षकाला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. याबाबत लोकसत्तामध्ये प्रकाशित वृत्त वाचून खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले व गृहमंत्री फडणवीस यांचे गृह खात्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही केली.
सरकारने महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नये. राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय अंमली पदार्थांची तस्करी अशक्य आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नवी मुंबई – नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा आहे. त्यामुळे खाडीकिनारी, पाणथळ क्षेत्रात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी तसेच स्थानिक पक्षी आढळतात. मात्र या विविध प्रजातींच्या पक्षांची नोंद महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिका शहरातील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरीत व स्थानिक पक्षांची गणना करणार आहे.
उद्धव ठाकरे यांना संजय राऊत खोटी माहिती देतात. संजय राऊत यांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पुत्राने पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, असे नरेश म्हस्के म्हणाले.
आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची परिस्थिती एका बाजूला आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळं आपल्याला जागरुक राहावं लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठं घडला, तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर सरकार तुमच्यावर गुन्हे दाखल करेल, विविध कलमे लावतील. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो.
- शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजेच शरद पवार आहेत. आता त्याच शरद पवारांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, ज्या दिवशी आम्ही त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारायला लागू त्यावेळी अवघड होईल.
- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
पती कांताराम, सासरे सत्यवान, सासू बायसाबाई यांनी दीपाली यांच्याकडे घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती.
अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केले. दुगडच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी घाबरली.
नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी विविध मंडळ समूह मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करतात. याप्रसंगी महाप्रसाद आणि भोज दनासाठी मोठी गर्दीही होते.
नवरात्रोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून मंडळाच्या सचिवांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांनतर कोयता दाखवून त्यांना धमकावले.
शरद पवार हुकुमशाह आहेत, असा आरोप केला जात आहे. मात्र, या कार्यक्रमात इतका वेळ ते बसले आहेत, एकदाही ते तू बोलू नकोस, तूच बोल, कुणीच बोलायचं नाही, आता मीच एकटा बोलणार असं काही बोलले नाहीत. शरद पवार हुकुमशाहीने, मनमानी करून पक्ष चालवतात असा आरोप केला जात आहे. मात्र, माझ्यासह इथं बसलेल्या कुणालाही तो अनुभव नाही. एकटा जालना जिल्ह्यातील निर्णय घ्यायचा असेल, तरी शरद पवारांनी राजेश टोपे आणि त्या जिल्ह्याच्या अध्यक्षासह कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय प्रमुख निर्णय कधीच घेतला नाही.
- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल की, निवडणुकीला इतके पैसे खर्चायला देतो, तेवढे देतो. ते सगळं होईल, मात्र शिक्का मारायला माणसं कुठून आणणार? मतं देणाऱ्या माणसांच्या मनात शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवार जिथं उभे राहतील, तिथं पक्ष असेल. आज निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई सुरू आहे. त्या सुनावणीत शरद पवारांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं जात आहे. २५ वर्षे शरद पवारांच्याच कार्यशैलीमुळे यांना पदं मिळाली, हे मंत्री झाले, वेगवेगळ्या पदांवर पोहचले. आज २५ वर्षानंतर त्यांच्याच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करता, मग २५ वर्षे तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय?
- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी विविध मंडळ समूह मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करतात. याप्रसंगी महाप्रसाद आणि भोज दनासाठी मोठी गर्दीही होते.
शरद पवार आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात. यात सगळंच आलं. कार्यकर्त्यांना यावरून काय प्रकार सुरू आहे हे सगळं लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत. आपल्याला लढायचं आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा, त्यांची ताकद, जनतेच्या मनातील शरद पवारांबद्दलचं आदराचं स्थान माझं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं भांडवल आहे.
- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
बऱ्याच जणांना अशी शंका आहे की, हे दोन्ही गट परत एकत्र आले, तर कशाला डोक्याला त्रास. अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की, आम्ही एक होणार नाही. सगळ्यांना ही शंका असल्याने कशाला घाई, कळ काढा, असं कार्यकर्ते एकमेकांना म्हणतात. एक महिला कार्यकर्ती दुसरीला म्हणते की, तुला काही कळतं का, ते आतून एकच आहेत. मी महिला कार्यकर्त्यांच्या मनातील बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तसं काहीही नाही. आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ही शक्कल आहे. आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबुज केली जात आहे.
- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
फेरीवाले मोठ्या संख्येने जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. फेरीवाल्यांनी मात्र कोणताही हल्ला केला नसल्याचा दावा केला आहे.
पनवेल : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल दौऱ्यासाठी बुधवारी येणार असल्याने शहरातील मुख्य चौकातील रस्ता डांबराने तुळतुळीत केल्यामुळे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बुधवारी उभे राहिले. यावेळी शेकाप पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये रस्त्यात खड्डे पडले आणि सध्या डांबराने तुळतुळीत केलेले रस्ते अशी छायाचित्रे होती.
पत्नीला ब्रेन ट्यूमर असल्यामुळे पतीने दुसरीशी प्रेमविवाह केला. दोन्ही पत्नी एकमेकींसोबत गुण्यागोविंदाने राहू लागल्या. मित्राच्या सांगण्यावरून आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे संसार तुटण्याच्या काठावर आला.
८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि २० हजार रुपये जादा रक्कम एकत्रित दिली जाणार आहे.
महामेट्रोने नळस्टॉप चौकात उभारलेल्या दुमजली उड्डाणपुलाप्रमाणेच या पुलाची रचना असणार आहे. मेट्रोच्या खांबांशी तो संलग्न असेल.
मध्य प्रदेशातील चोरट्यांची टोळी मध्यरात्री सोसायटीच्या आवारात शिरायची. बंद सदनिकांची पाहणी करुन कटावणीने कुलूप तोडायचे. ऐवज लांबवून पसार व्हायचे.
सोनाली विवाहित होती. विवाहानंतर तिचा घटस्फोट झाला. ऊरळी कांचन परिसरात ती माहेरी राहत होती.
महापालिकेची नियमावली खासगी तलावांना लागू होत नाही, असे क्रीडा विभागाच्या उपायुक्त डाॅ. चेतना केरूरे यांनी सांगितले.
मुंबई : दिवाळी जवळ येऊ लागली असून मुंबई महानगरपालिकेमध्ये सानुग्रह अनुदान अर्थात बोनसचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेतील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने बोनसच्या मागणीसाठी मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ विकण्याचं काम सुरू आहे. पोलिसांना सर्व गोष्टी माहिती आहेत. माझी पोलिसांना विनंती आहे की, उमलती फुलं जाळू नका. १८-१९ वर्षांची मुलं आहेत. मलाही मुलं आहेत आणि सर्वांनाच मुलं आहेत. अशापद्धतीने घराजवळ मुलांना गांजा आणि अमली पदार्थ सहजपणे मिळत असतील, तर अत्यंत चुकीचं आहे. पोलिसांनी यात लक्ष घातलं पाहिजे.
- रवींद्र धंगेकर (काँग्रेसचे आमदार)
२३ गावांतील विकासासाठी महापालिकेकडून २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावांमध्ये सुविधा पुरविणे आणि समस्या सोडविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आहे.
नैसर्गिक इंधनावर (सीएनजी) धावणाऱ्या आणि विजेवर धावणाऱ्या या बस (इलेक्ट्रिकल बस- ई-बस) प्रासंगिक करार सुविधेसाठी देण्यात येणार आहेत.
मी तर गोल बिल्डिंगमधील श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबद्दल तेव्हाही कागदपत्रांसह बोलले होते. मी आत्ताही माझा विवेक जागा ठेवत कुठल्याही शब्दांचा फेरफार न करता, शब्दच्छल न करता, कुठलेही आढेवेढे न घेता मी पुन्हा शांतपणे सांगते आहे की, ससूनचे आधीचे अधिष्टाता काळे, आताचे अधिष्टाता ठाकूर, ललित पाटलावर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.
- सुषमा अंधारे (शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या)
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स