Maharashtra Breaking News 10 August 2023: महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो केंद्रातला अविश्वास प्रस्ताव. मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यावर सध्या चर्चा सुरु आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून स्वतःचं वस्त्रहरण केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन विरोधक टीका करताना दिसत आहेत. आता आज यासह महाराष्ट्रात काय काय घडामोडी घडणार यावर आपण लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या अपडेट्स
Mumbai Maharashtra Live Today|अविश्वासदर्शक ठरावावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका आणि महत्त्वाच्या घडामोडी
मुंबई : गतवर्षी राज्यामध्ये झालेल्या गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर यंदा एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, तसेच केंद्र सरकारच्या गोवर रुबेला दुरीकरणाचे ध्येय डिसेंबर २०२३ पर्यंत गाठण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे.
नागपूर : नागपूरसह देशभरात १९ जुलैला सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेटसाठी ६० हजार रुपयांवर गेले होते. त्यानंतर पुन्हा हे दर कमी झाले. गेल्या आठवड्याभरातील दर बघितल्यास गुरुवारी दुपारी १.४२ वाजता नागपुरात सोन्याचे दर प्रती दहा ग्राम ५९ हजार ३०० रुपये असे निच्चांकी नोंदवले गेले.
अकोला : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी पदभरतीच्या नावावर उमेदवारांकडून खासगी कंपन्यांमार्फत शुल्क वसूल करत फंड उभा केला जात आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला.
नागपूर : सर्व देशात चकचकीतपणासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर मेट्रोच्या डब्ब्यांचे विद्रुपीकरण करण्याची घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज पाहून अज्ञाताचा शोध घेतला जात आहे.
कल्याण- यंदा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सगुणा तंत्रज्ञानाच्या भात लागवडीला (एस. आर. टी.) शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले. जून-जुलैमध्ये शेतांमध्ये लागवड केलेली भात रोपे आता बहरली आहेत. या लागवडीमध्ये कष्ट, मजुरीचा प्रकार कमी होत असल्याने शेतकरी या लागवडीला प्राधान्य देत आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चंद्रपूर : किमान धन आरोग्य योजनेमध्ये सुपरवायझर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार तरुणाची तब्बल चार लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
नागपूर: नागपुरातील काटोल रोड, पोलीस मुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत किशोर तिजारेंचा (४५) अपघातामुळे मेंदूमृत झाला. जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांच्या अवयवदानातून चार कुटुंबाना मोठा आधार दिला.
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत "फ्लाइंग किस" केल्याची तक्रार मंत्री स्मृती ईराणी आणि भाजपच्या महिला खादारांनी केली आहे. एवढेच नव्हे तर भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने राहुल गांधी विरोधात आंदोलन केले जात आहे.
धुळे - प्रलंबित मागण्यांसाठी तसेच संघटनेचे कमांडर राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ इपीएस- ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय संघटनेच्या वतीने गुरुवारी येथे क्युमाईन क्लबसमोर उपोषण करण्यात आले. प्रलंबित मागण्यांची केंद्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
पुणे : मागील काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली.
नागपूर : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बुधवारी राहुल गांधींनी सदनातून बाहेर पडताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना ‘फ्लाइंग किस’चे हावभाव केले अशी त्यांनी तक्रार केली आहे. त्यानंतर आता ‘फ्लाइंग किस’ हा शब्द सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.
वसई – पाच वर्षांपूर्वी नालासोपारा येथे झालेल्या जोगेंद्र राणा हत्या प्रकरणात मनोज सकपाळ आणि मंगेश चव्हाण या दोन पोलिसांवर तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणे पोलिसांतर्फे या प्रकरणाची नव्याने चौकशी केली जाणार आहे.
अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीत १३ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले असून अद्याप ५ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर येत्या काळात एटिकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाईल.
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अजून काही महिन्यांचा अवकाश असताना इकडे सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असलेल्या प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा मतदारसंघात पुढील खासदार कोण, यावरून याच पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थकांमध्ये समाज माध्यमांतून जोरदार संघर्ष युद्ध पेटले आहे.
नागपूर : राहुल गांधी यांचे लोकसभेतील कृत्य म्हणजे पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार निवडून यावे यासाठी केलेली मदत आहे. राहुल गांधी यांच्याकडून संसदेत अपमानजनक व्यवहार अपेक्षित नाही, खास करून अशी व्यक्ती ज्याची पंतप्रधान व्हायची इच्छा आहे, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी घेण्यात आलेल्या) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९मधील ९४ पात्र उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे 'आम्हाला नियुक्ती द्या' असे फलक हाती घेऊन नियुक्ती प्रलंबित असलेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
नागपूर : पेंच प्रकल्पाचा डावा कालवा बांधण्याकरिता भूसंपादनाची नोटीस बजावून संपादित जमिनीवर नागपूरचा बाह्यवळण मार्ग (आऊटर रिंगरोड) बांधण्यात आला आहे. या रस्त्यासाठी मौजा फेटरीसह नागपूर जिल्ह्यातील अनेकांची शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली. मात्र, उर्वरित जमिनीबाबतची कागदपत्रे शेतकऱ्यांना २५ वर्षांनंतरही उपलब्ध करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे.
वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. आज पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयावर या सामाजिक संघटना मोर्चा काढत होत्या. त्या अगोदरच त्यांचा मोर्चा पोलिसांनी काही अंतरावर अडवला. पोलीस आणि आंदोलक समोरीसमोर आलेत.
नागपूर: शहरातील विविध भागातील तीन हजाराहून अधिक पदपथ हे चालण्यायोग्य स्थितीत नाही, त्यावर चार हजाराहून अधिक फुटकळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असे सिव्हीक ॲक्शन ग्रुपने (कॅग) केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती.
नागपूर : एसटीच्या नागपूर विभागातील आठही आगारांत डिझेलची टंचाई सुरू आहे. त्यामुळे गाड्या उशिरा सोडणे वा काही प्रसंगी फेऱ्या रद्द करण्याची पाळी महामंडळावर येत आहे. आर्थिक अडचणीतून हा प्रकार सुरू असला तरी विभाग नियंत्रक येथील आगार व्यवस्थापक वेळीच मागणी नोंदवली नासल्याने सुरवातीला थोडी अडचण आली, पण आता स्थिती सामान्य असल्याचा दावा करत आहे.
गडचिरोली : नुकत्याच निघालेल्या तलाठी व वनरक्षक भरतीत ‘पेसा’ क्षेत्रातील आदिवासी व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी दिलेल्या जागांवरून गडचिरोली जिल्ह्यात राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळून निघाले. यादरम्यान सत्ताधारी आदिवासी नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे व केलेल्या बेताल वक्तव्यामुळे जिल्ह्यात कधी नव्हे ते आदिवासी समाजाच्या तरुण व तरुणींनी मोठ्या संख्येने एकत्र येत थेट भाजप खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे यांच्याविरोधात आक्रोश मोर्चा काढला.
नागपूर : इयत्ता ९ वी ते ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (यशस्वी) सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी देशभरातून १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
नागपूर : शहर पोलीस दलातील तीन कर्मचारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या कार्यालयात बिनधास्त पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. युनिटच्या पदाधिकाऱ्यांना मात्र सूट देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूर : राज्य पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा आकडा मोठा असल्याने कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. बंदोबस्त आणि तपास करताना पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
डोंबिवली- येथील पूर्व रेल्वे स्थानकातील रामनगर तिकीट खिडकीजवळील जिन्या जवळ पहाटे पासून सकाळी आठ वाजेपर्यंत अनेक रिक्षा चालक रस्ता अडवून प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे सकाळी गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना अडथळे पार करत रेल्वे स्थानकात जावे लागते.
मुंबई : दहिसर – मिरारोड मेट्रो ९ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन, डोंगरीतील ५९ हेक्टर तर कल्याण-तळोजा मेट्रो १२ मार्गिकेतीलह कारशेडसाठी निळजे-निळजेपाडा येथील ४७ हेक्टर जागा दोन ते तीन दिवसात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात येणार आहे.
अकोला: पातूर येथील १९ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण आले आहे. पीडितेची हत्या करण्यापूर्वी अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले.
पुणे: विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून संगणक अभियंता तरुणीवर पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
वर्धा: आयआयटी दिल्ली येथे ४२ वर्ष अध्यापन व त्यानंतर दोन वर्ष मानद प्राध्यापक म्हणून कार्य केलेले पद्मश्री डॉ.किरण सेठ क्रांतीदिनी वर्धेत पोहचले.
अविश्वास ठरावाआधी विधेयक मंजुरीला विरोधकांचा आक्षेप ; दोन दिवसांत सहा विधेयके चर्चेविना मंजूर
महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो केंद्रातला अविश्वास प्रस्ताव. मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यावर सध्या चर्चा सुरु आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून स्वतःचं वस्त्रहरण केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन विरोधक टीका करताना दिसत आहेत. .