Maharashtra News Today, 11 September 2025: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आधी मराठा आंदोलन व मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे वातावरण तापल्यानंतर आता ओबीसी समाजानं मराठा आरक्षणासंदर्भातल्या सरकारच्या जीआरला विरोध केल्यामुळे नव्या आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात सध्या दुबईत चालू असलेल्या आशिया कप स्पर्धेत १४ सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे या सामन्यासमोर राजकीय विरोधाचं संकट उभं राहिल्याचं दिसत आहे.

Live Updates

Marathi News Live Updates Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा

20:24 (IST) 11 Sep 2025

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतल्यास राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

महाराष्ट्र व कर्नाटक सरकारमध्ये २०१९ मध्ये झालेल्या करारानुसार १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणातील पाणीसाठा ५१७ मीटरपेक्षा कमी ठेवायचा आहे. ...वाचा सविस्तर
20:16 (IST) 11 Sep 2025

“मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय नाहीच”- मंत्र्यांचा दावा; पाच हजार पदनिर्मितीसाठी…

आगामी काळात आरोग्य क्षेत्रातील पाच हजार पदनिर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...सविस्तर वाचा
19:54 (IST) 11 Sep 2025

सरसकट ओबीसी आरक्षण नाही, पुरावे तपासूनच कुणबी दाखले देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

या शासननिर्णयामुळे कोणालाही सरसकट ओबीसी आरक्षण मिळणार नाही आणि पुरावे तपासूनच कुणबी दाखले दिले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ...सविस्तर बातमी
19:39 (IST) 11 Sep 2025

देशात जरांगेशाही कधीही… छगन भुजबळ यांच्याकडून मनोज जरांगे लक्ष्य

मराठा आंदोलनानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयावर मंत्री भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. प्रतिज्ञापत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे देशात कुठेही मान्य नसल्याचा दावा त्यांनी केला. ...सविस्तर वाचा
19:06 (IST) 11 Sep 2025

पिंपरी-चिंचवडमधील हरकतींवर सुनावणी; एका भेटीची चर्चा…

सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारामध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुफ्तगू झाल्याची चर्चा रंगली. ...सविस्तर बातमी
19:04 (IST) 11 Sep 2025

Video मुंब्रा-कौसात कारवाईवरून तणाव; पालिकेच्या पथकाला रहिवाशांनी अडवले, राज्य राखीव दल पाचारण

न्यायालयाच्या आदेशामुळे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना शीळ फाटा भागात जाऊन २१ अनधिकृत इमारतींवर कारवाई करावी लागली होती. ...सविस्तर वाचा
18:10 (IST) 11 Sep 2025

शिक्षणानंतर शहरांकडे न वळता शेती, उद्योगातून आत्मनिर्भर व्हा; चैत्राम पवार यांचे तरुणांना आवाहन

गावोगावच्या तरुणांनो शिक्षणानंतर शहरांकडे न वळता, गावातच ग्रामीण उद्योगधंदे, शेती अन् शिक्षणातून आत्मनिर्भर व्हा, असे आवाहन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदिवासी समाजाचे मार्गदर्शक चैत्राम पवार यांनी केले. ...सविस्तर वाचा
17:26 (IST) 11 Sep 2025

ते दोघेजण केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत : गृहराज्यमंत्री योगेश कदम

शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत.दुसर्‍या कोणत्याही मुद्द्यांसाठी ते एकत्र येत नाहीत. ...अधिक वाचा
17:14 (IST) 11 Sep 2025

हुतात्म्यांच्या स्मृतीतून नव्या पिढीने आदर्श घ्यावा - मनोज घोरपडे

स्वातंत्र्य संग्रामात पुसेसावळी भागातून शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला, त्यातील अनेकजण शहीद झाले. त्यांच्या स्मृती कायम ठेवून पुढील पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन आमदार मनोज घोरपडे यांनी केले. ...अधिक वाचा
17:01 (IST) 11 Sep 2025

ठाण्यात राज्यस्तरीय महाविद्यालयीन पंडितराव वक्तृत्व स्पर्धा....विजेत्यांना मिळणार 'ही' बक्षिसे

श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेतर्फे नी. गो. पंडितराव या बहुआयामी शिक्षकाच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे ५७ वे वर्ष आहे. ...अधिक वाचा
16:20 (IST) 11 Sep 2025

आकाशातून पडला भलामोठा बर्फसदृष्य गोळा ! अवघे गाव ते पाहण्यासाठी लोटले; पण…

बुधवारची सकाळ वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हमदापूर वासियांसाठी आश्चर्याची ठरली. आकाशातून भलामोठा बर्फसदृष्य गोळा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ...अधिक वाचा
16:04 (IST) 11 Sep 2025

सात महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकून दुर्दैवी मृत्यू

बीड तालुक्यातील काटवटवाडी येथे सात महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्याने तिचा मृत्यू झाला. ...वाचा सविस्तर
16:00 (IST) 11 Sep 2025

वाशीत पुन्हा धुरक्याचे सावट; नागरिक हैराण, लहान मुले व वृद्ध सर्वाधिक बाधित

वाशीतील सेक्टर २६ हे या धुरक्यांचे केंद्र स्थान बनले असून या व्यतिरिक्त सेक्टर २८, २९ तसेच तुर्भे व कोपरखैरणे भागातून याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत ...वाचा सविस्तर
15:54 (IST) 11 Sep 2025

शहरी नक्षलवाद : तळोजा कारागृह अधीक्षकांचा उच्च न्यायालयात माफीनामा

गायचोर यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला असतानाही त्यांची कारागृहातून सुटका न केल्यावरून न्यायालयाने बुधवारी कारागृह प्रशासनाला धारेवर धरले होते. ...अधिक वाचा
15:45 (IST) 11 Sep 2025

Metro 5 project: चिखलोली पर्यंतची मेट्रो ५ बदलापूर बस आगारापर्यंत विस्तारित करा; माजी नगराध्यक्ष राम पातकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बदलापूर शहर परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्याप्रमाणात या भागात रस्ते वाहतूक, रेल्वे, इतर वाहतूक सुविधा, पर्यायी रस्ते मार्ग, वाढीव पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी माजी नगराध्यक्ष राम पातकर शासनस्तरावर प्रयत्नशील आहेत. ...अधिक वाचा
15:36 (IST) 11 Sep 2025

मुंबई : प्रियकरासाठी महिलेने केली स्वत:च्या घरात चोरी… मुलीच्या प्रियकरावर ठेवला डोळा

गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात एक पालिका कर्मचारी पत्नी आणि मुलीसह राहतो. त्यांच्या घरात २८ ऑगस्ट रोजी चोरी झाली. ...अधिक वाचा
15:28 (IST) 11 Sep 2025

CM Devendra Fadnavis: छत्रपतींचा अवमान करण्याची काँग्रेसची परंपरा नेहरूंपासून - देवेंद्र फडणवीस

बंगळुरूतील शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो. एक प्रकारे हा शिवरायांचा अपमान करण्याचं काम कर्नाटकचं काँग्रेस सरकार करतंय. मला याचं दु:ख आहे. पण याचं मला नवल वाटत नाही. कारण छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असल्यापासून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात नेहरूंनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात त्यांनी जे मत व्यक्त केलं होतं ते सगळ्यांना माहिती आहे. तीच परंपरा कर्नाटक काँग्रेस सरकारमध्ये दिसत आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. ज्यांच्यामुळे या देशानं स्वराज्य पाहिलं, अशा छत्रपती शिवरायांचं नाव काढून धार्मिक विरोधी व्यवस्था उभी करून तेढ निर्माण केली जाणार नाही अशी सुबुद्धी त्यांना मिळावी अशी माझी अपेक्षा आहे - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

15:16 (IST) 11 Sep 2025

वाढवण बंदर राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणशी जोडणार

राज्यातील सर्व महत्वाची ठिकाणे वाढवण बंदराशी जोडण्यात येणार असून तसेच इज ऑफ राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...सविस्तर बातमी
15:05 (IST) 11 Sep 2025

DGP Rashmi Shukla Nana Patole Defamation Case : रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धचा फोन टॅपिंग प्रकरणी मानहानीचा दावा रद्द

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल केलेला मानहानीचा दावा न्यायालयाने रद्द केला आहे. ...सविस्तर वाचा
14:54 (IST) 11 Sep 2025

Video : गणेश नाईकांनी स्वतःला रावण म्हटले का? खासदार नरेश म्हस्के यांचे प्रतिउत्तर

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी "रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का?" असे विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...वाचा सविस्तर
14:52 (IST) 11 Sep 2025

मद्यप्राशन करून पत्नीला आणायला गेला अन् पुढे घडला अनर्थ , मेहुणी व तिच्या मुलाने…

सहा महिन्यांपासून वेगळी राहणाऱ्या पत्नीला आणण्यासाठी पती मद्यप्राशन करून गेला. त्याठिकाणी पत्नीबाबत विचारणा करून त्याने दोन मेहुण्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.अखेर दोन मेहुण्या व मुलाकडून केलेल्या मारहाणीत मद्यपेयी जावयाचा मृत्यू झाला ...सविस्तर बातमी
14:50 (IST) 11 Sep 2025

तरुणांमधील वाढत्या आत्महत्या एक गंभीर संकट!

दुर्दैवाने त्यांची वेदनादायी हाक ऐकून मदतीला धावण्याची समाजाची मानसिकता हरवत चालल्यामुळे या आत्महत्या एक ‘मूक महामारी’ बनू लागली आहे. ...अधिक वाचा
14:44 (IST) 11 Sep 2025

कॉंग्रेस खासदार पडोळे यांच्या वाहनाला भीषण अपघात; थोडक्यात बचावले

दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाकरिता मतदान करून ते विमानाने मुंबईला पाेहचले. तेथे कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाऱ्याकडे परतत होते. ...सविस्तर बातमी
14:41 (IST) 11 Sep 2025

गडकरींनी उड्डाणपुलाला दिले काँग्रेसच्या नेत्याचे नाव

नागपुरातील अमरावती मार्गावरील आरटीओ चौक ते फुटाळा चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन येत्या एक-दोन दिवसात होणार आहे. ...वाचा सविस्तर
14:23 (IST) 11 Sep 2025

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस सतर्क

धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर लगेचच मुंबई पोलीस सतर्क झाले असून, समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
14:18 (IST) 11 Sep 2025

अकोल्यातील १० पर्यटक नेपाळमध्ये अडकले; काठमांडूच्या हॉटेलमध्ये….

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि भारतीय दूतावास अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात आहेत. ...अधिक वाचा
14:18 (IST) 11 Sep 2025

अकोल्यातील १० पर्यटक नेपाळमध्ये अडकले; काठमांडूच्या हॉटेलमध्ये….

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि भारतीय दूतावास अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात आहेत. ...अधिक वाचा
14:14 (IST) 11 Sep 2025

अभियांत्रिकी महाविद्यालयांना दणका… 'डीटीई'कडून प्रवेशांच्या तपासणीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) पुण्यातील नामांकित संस्थांच्या २९ महाविद्यालयांवर निरीक्षक नियुक्त केले असून, संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेचे निरीक्षण करून सविस्तर अहवाल १६ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...सविस्तर बातमी
14:12 (IST) 11 Sep 2025

pune crime : पुत्रप्राप्तीच्या बतावणीने भोंदूकडून महिलेची तीन लाखांची फसवणूक; सहकारनगर पोलिसांकडून भोंदू गजाआड

पुत्रप्राप्तीची बतावणी करुन महिलेकडून तीन लाख १५ हजार रुपये उकळणाऱ्या भोंदूला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. ...सविस्तर बातमी
14:11 (IST) 11 Sep 2025

pune crime : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून अंगठी चोरी; महिलेविरुद्ध गुन्हा

दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून एका महिलेने ३५ हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना वडगावशेरी भागात घडली. ...सविस्तर वाचा

Raj Thackeray and Uddhav Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (file photo)

Marathi News Live Updates Today: वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व स्थानिक घडामोडी