Maharashtra, Mumbai Breaking News Updates : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिंमत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे,असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला आहे. तर सभेतील गर्दी पाहून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा उसळून बोलले व त्यांच्या प्रत्येक फटकाऱ्यासरशी विरोधकांचे एक-एक दात घशात गेले, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. तर अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगालच्या उपसागरात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेत पूर्ण झाले असून सोमवारी पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates: राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सविस्तर बातमी
सध्या सोशल मीडियावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहेत. संबंधित कार्यकर्त्यांना बजरंग दलाकडून त्रिशूल दीक्षा आणि एअर गनचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. सविस्तर बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज धुळे दौऱ्यावर आला होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरं दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना ईडी सारख्या यंत्रणेचा कशा पद्धतीने गैरवापर केला जातो, याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौरांबाबतही भाष्य केलं आहे. सविस्तर बातमी
बनारसमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा वाद ताजा असताना आता कर्नाटकातील मांड्या येथे बांधलेल्या जामा मशिदीवरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. टिपू सुलतानने हनुमानाचं मंदिर पाडून त्याठिकाणी ही मशीद बांधली असल्याचा दावा एका हिंदुत्ववादी गटाकडून करण्यात आला आहे. सविस्तर बातमी
छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केली आहे. आता शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिला आहे.
सांगलीत सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची रविवारी (१५ मे) रात्री वाळव्यातील खोखो स्पर्धेच्या मैदानात डोक्यावर बेतलं ते खांद्यावर निभावलं अशी अवस्था झाली. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय निमंत्रित खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
जालन्यातील चांदई एक्को गावातील प्रवेशद्वाराला नाव देण्याच्या वादातून जालन्यातील चांदई एक्को गावात १२ मे रोजी दोन गटात राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०२ गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आणि काही जणांना अटक करण्यात आली. गावातील या राड्याची माहिती मिळताच केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (१६ मे) चांदई एक्को गावात जाऊन दोन्हीही गटांशी चर्चा करून हा वाद मिटवलाय.
'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या पुस्तकाचं नुकतंच स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशनाच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी महिला नेत्या वैशाली नागवडे यांच्यासह चार महिलांनी स्मृती इराणी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजीनंतर काही भाजपाच्या महिलांकडून त्यांना मारहाण केली आहे, असा आरोप वैशाली नागवडे यांनी केला आहे.
२०१४ मध्ये जो भाग काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा त्या अमेठीमधून मी निवडणूक लढवण्याचं धैर्य दाखवलं. २०१९ मध्ये भाजपाने अशी निवडणूक लढवली की काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांना मतदारसंघ बदलावा लागला. त्यामुळे काँग्रेस माझ्यावर नाराज असणं साहजिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही काँग्रेस मधूनच तयार झालेला पक्ष आहे. त्यामुळे तेही माझ्याविरोधात आक्रमक असणं स्वाभाविक आहे. मी एवढंच सांगेन की, आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना राष्ट्रीय राजकारणात पहिल्यांदा हरवलं. एका सामान्य कार्यकर्त्यानं अध्यक्षांना हरवलं याचं दु:ख नेहमीच काँग्रेसला राहील, असंही त्या म्हणाल्या.
शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. राज ठाकरेंवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाची आठवण करुन दिली. यावरुन आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. वाचा सविस्तर...
उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे. अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून धडकणार आहे. दरम्यान, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर बातमी
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. 'काश्मीर फाईल' चित्रपटामुळे संपूर्ण देशात द्वेष निर्माण होत आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
केतकी चितळेला ठाण्याहून तिच्या कळंबोलीच्या राहत्या घरी आणण्यात आले. गेल्या तीन दिवसांपूर्वी केतकीवर हल्ला झाल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी केतकीच्या घरातून संगणक व इतर साहित्य जप्त केले आहे.
“आज गौतम बुद्ध पौर्णिमा आहे, त्यांना मी वंदन करतो, जगाला दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा समर्पणाचा संदेश दिला. आज आपल्या महाराष्ट्रात देखील त्यांच्या विचारांची गरज आहे. कायदा सुव्यवस्था चांगली राहण्या करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आम्ही सर्व जण मनापासून प्रयत्न करत आहोत. अधिकारी देखील साथ देत आहेत. परंतु, काही जण जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण, समाजात अंतर पाडण्याचं काम करत आहेत,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या संकुलनाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
देशभरात सध्या विविध धार्मिक स्थळांवरून वादाचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या वादानंतर आता एका हिंदुत्ववादी संघटनांनी आपला मोर्चा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार या वास्तुकडे वळवला आहे. संबंधित वास्तू ही कुतुबमिनार नसून विष्णू स्तंभ असल्याचा दावा त्यांनी केलाय. यानंतर आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सविस्तर बातमी
एका महाविद्यालयीन प्राध्यापिकेच्या नावे समाजमाध्यमांवर बनावट खाते उघडून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महाविद्यालीयन तरुणांना अटक केली आहे.
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचे (नाटो) प्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी दावा केला की, युक्रेन रशियासोबत युद्ध जिंकू शकते. बर्लिनमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीदरम्यान स्टोलटेनबर्ग यांनी हा दावा केला आहे.
आगामी येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी ‘ब्राह्मण’ समाजाचा मुख्यमंत्री बसावा अशी आमची इच्छा असून त्याकरिता भाजपाला पूर्ण समर्थन करणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. वाचा सविस्तर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मिनाझ मर्चंट लिखित ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोविड काळातील आठवणींना उजाळा दिला. वाचा सविस्तर...
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसमधील वाद वाढला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईमधील काळा घोडा परिसरात एसप्लानेड मॅनशन्स इमारतीत मोठी आग लागल्याची घटना घडली. यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी येऊन आग विझवली.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका वनविभागाच्या कर्मचाऱ्याने बिबट्याच्या बछड्याला जीवदान दिलं आहे. वनकर्मचारी अशोक घुले यांनी पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजलं आहे. सविस्तर बातमी आणि व्हिडीओ
रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन आगरातील बागमांडले येथून सकाळी सव्वा दहाला सुटणाऱ्या बसला साखरोने फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बस चालकाच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात १६ प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. ४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. सविस्तर बातमी
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचं काम १३ ते २४ मे दरम्यान केलं जात आहे. त्यामुळे हा पूल १० दिवसांसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे या पुलाखालून वाहतूक वळवण्यात आली आली आहे. पूल बंद असल्याने पुलाखालील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी मिळून हा उड्डाणपूल बांधला आहे. वाहतुकीसाठी चांगला पर्याय असलेल्या या उड्डानपुलाची डागडुगी करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी ही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. २४ मेपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याचा अंदाज घेऊनच प्रवास करावा.
अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुजात यांनी केतकीवर टीका करताना शरद पवार हे जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व असल्याचं म्हटलंय. वाचा सविस्तर...
राज्याचे आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथून जात असताना एका अपघातग्रस्त दुचाकी चालकाला मदत केली. देवगाव रंगारी गावाजवळ एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती आणि तो रस्त्यावर पडलेला होता. वाचा सविस्तर...
मुंबई तुंबई होण्यास कारणीभूत ठरते ती समुद्राला येणारी भरती. या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडल्यास पाणी मुंबई शहरामध्ये साचून राहण्याची भीती असते. नालेसफाईसोबतच समुद्राच्या भरतीकडेही प्रशासनाला लक्ष द्यावं लागतं. अधिक वाचण्यासाठी क्लिक करा
वारकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी केतवीवर देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
देवेंद्र फडणवीसांच्या वजनाने बाबरी मशिद खाली आली असती, अशी टीका शनिवारी मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. अयोध्येला गेलो तेव्हा मी नगरसेवक आणि वकील होतो, असे सांगत गोळ्या -लाठ्यांची पर्वा न करता अयोध्या आंदोलनात गेलो होतो, असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यांवरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नेमकं काय घडलं असतं यावर फडणवीसांनी भाष्य केलंय. ते काय म्हणालेत वाचा येथे क्लिक करुन
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.