Maharashtra Politics Updates, 14 August 2025 : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांचा विषय चांगलाच चर्चेत आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयावर देखील आक्षेप घेतले जात आहेत, यादरम्यान माझ्या सरकारने घेतलेला नाही. यासंदर्भात महापालिकांना अधिकार देण्याचा निर्णय आधीच्या सरकारच्या काळात म्हणजे १९८८ मध्ये घेण्यात आला होता, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कोणी काय खावे, हे ठरविण्यात राज्य सरकारला रस नाही. आम्हाला लक्ष देण्यासाठी दुसरे अनेक विषय आहेत असेही फडणवीस म्हणाले आहेत. याबरोबरच संपूर्ण राज्यात बुधवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला, शुक्रवारपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Live Updates

Mumbai Breaking News : महाराष्ट्रातील सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:41 (IST) 14 Aug 2025

राजेंद्रसिंह गौर यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

यापूर्वी २०१८ मध्ये त्यांच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना पहिल्यांदा राष्ट्रपती पदक सन्मान मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा २०२५ मध्ये उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. ...वाचा सविस्तर
19:56 (IST) 14 Aug 2025

जालन्यात कापसाचे ४३ हजार हेक्टर क्षेत्र घटले; भाव घसरल्याचे परिणाम

जालना हा प्रामुख्याने कापूस पीक घेणारा जिल्हा आहे. एकूण खरीप पिकांपैकी ४५ ते ५० टक्के क्षेत्र या पिकाचे नेहमीच राहत आले आहे. ...सविस्तर बातमी
19:45 (IST) 14 Aug 2025

एफडीएचे ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ अभियान सुरू, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी

गणेशोत्सव, ईद, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी या सणांच्या काळात मिठाई, मोदक, फराळ, प्रसाद यासारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. ...अधिक वाचा
19:37 (IST) 14 Aug 2025

सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणात एसआयटीचे आदेश

खंडपीठात सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास सुरू असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदन करण्यात आले. ...सविस्तर वाचा
19:30 (IST) 14 Aug 2025

सर्पदंश झालेल्या रूग्णावर उपचार भलतेच, नागपुरातील एम्स रुग्णालयात गोंधळ, नातेवाईक संतप्त

नागपुरातील खापरी परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाला २ ऑगस्टला सर्पदंशानंतर एम्समध्ये दाखल केले होते. ...वाचा सविस्तर
19:17 (IST) 14 Aug 2025

कामात दिरंगाई व गुणवत्तेत तडजोड नकोच; असे का म्हणाले कृषिमंत्री?

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी बैठकीला लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. ...वाचा सविस्तर
18:34 (IST) 14 Aug 2025

...तरच मतदार यादीतून नाव वगळता येते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली प्रक्रिया !

निवडणूक आयोगाला हाताशी धरून केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या हितासाठी लाखो नागरिकांची मतदार यादीतून नावे काढून टाकण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. ...अधिक वाचा
18:30 (IST) 14 Aug 2025

वैद्यकीय, दंत अभ्यासक्रमासाठी १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. ...वाचा सविस्तर
18:06 (IST) 14 Aug 2025

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला १२५.१९ कोटींचा निव्वळ नफा

करपूर्व २३३.४८ कोटींचा ढोबळ नफा झाला असून, बँकेत ११ हजार ४६९ कोटी १३ लाख इतक्या ठेवी आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी दिली. ...सविस्तर वाचा
18:06 (IST) 14 Aug 2025

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला १२५.१९ कोटींचा निव्वळ नफा

करपूर्व २३३.४८ कोटींचा ढोबळ नफा झाला असून, बँकेत ११ हजार ४६९ कोटी १३ लाख इतक्या ठेवी आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी दिली. ...सविस्तर वाचा
17:54 (IST) 14 Aug 2025

‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने 'या' तारखेपर्यंत…

राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्याला आता चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत ही पाटी लावण्याची मुदत होती. ...वाचा सविस्तर
17:33 (IST) 14 Aug 2025

दिल्लीची हवा आरोग्यासाठी अपायकारक? काय आहे आयआयटीएम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधन?

दिल्लीतील प्रदूषण प्रामुख्याने हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे संशोधनात हवेतील सूक्ष्म धूलिकणांतील घटकांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात धूलिकणांमध्ये विषारी घटक असल्याचे आढळले. ...सविस्तर वाचा
17:33 (IST) 14 Aug 2025

डोंबिवलीत फडके रस्त्यावरील दहीहंडी सरावासाठी रस्ता बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी; व्यापारी वर्गात संताप

बापूसाहेब फडके रस्त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखेकडून गुरूवारी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दहीहंडी पथकांचा भव्य सराव कार्यक्रम आयोजित केला आहे. ...वाचा सविस्तर
17:25 (IST) 14 Aug 2025

पुढील तीन दिवस राज्यात घरांची खरेदी-विक्री व्यवहार ठप्प...राज्यातील नोंदणी विभागाचे कामकाज राहणार तांत्रिक कारणास्तव बंद

नोंदणी विभागाच्या आय-सरीता (i-Sarita) प्रणालीतील सर्व्हरचे तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीची काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे नोंदणी विभाग तीन दिवस बंद राहणार असून त्याअंतर्गत होणाऱ्या सर्व सेवांचे काम थांबणार आहे. ...वाचा सविस्तर
17:23 (IST) 14 Aug 2025

मुंबईच्या आर्थिक-सामाजिक परिवर्तनाचा इतिहास म्हणजे बीडीडी चाळ - मुख्यमंत्री

बीडीडी झाले आता धारावी करून दाखवणार, महायुतीचा निर्धार, वरळीतील ५५६ घरांचे चावी वाटप ...वाचा सविस्तर
17:08 (IST) 14 Aug 2025

बुलढाणा जिल्ह्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक… नक्षलग्रस्त भागात काम करताना…

नक्षलग्रस्त भागात तीन वर्ष सेवा देताना नक्षल विरोधी अभियान राबवून शांतता स्थापित केली. ७९ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे मदत केली. ...अधिक वाचा
16:59 (IST) 14 Aug 2025

मतदार यादीतील दुबार नाव वगळण्यासाठी बीएलओ यांना सूचना; निवडणूक कामात कामचुकारपणा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार, जिल्हाधिकारी

मतदार यादीत दुबार असणारी नाव वगळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी लक्षपूर्वक कारवाई करावी यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिल्या आहेत. ...सविस्तर वाचा
16:58 (IST) 14 Aug 2025

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत नवीन माहिती… फिटिंग शुल्क, पाटीला सुरक्षा आवरणाच्या नावावर…

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सगळ्याच वाहनांना एचएसआरपी पाटी बंधनकारक आहे. ही पाटी बसवण्यासाठी १५ ऑगस्ट शेवटची मुदत आहे. ...सविस्तर बातमी
16:57 (IST) 14 Aug 2025
१५ ऑगस्ट रोजी इम्तियाज जलील यांनी आयोजित केली चिकन आणि मटन पार्टी; मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण

"१५ ऑगस्ट रोजी सर्व मटन आणि चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे तुघलकी फर्मान जारी करणाऱ्या सर्व महापालिका आयुक्तांना १५ ऑगस्ट दुपारी १ वाजता माझ्या घरी आय़ोजित चिकन बिर्याणी आणि मटन कोरमा पार्टीच सहभागी होण्याचे निमंत्रण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. (भारत एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे आणि महाराष्ट्र एखाद्या हुकुमशाही राजवटीतील राज्य नाही.) ही पार्टी फक्त जे आत्तापर्यंत स्वतंत्रतेचा अर्थ समजले नाहीत अशा लोकांना लक्षात आणून देण्यासाठी आयोजित केली जात आहे," अशी पोस्ट इम्तियाज जलील यांनी केली आहे.

16:40 (IST) 14 Aug 2025

सह पोलीस आयुक्त रेड्डी यांच्यासह चार जणांना राष्ट्रपती पुरस्कार

भारतीय पोलीस सेवेत अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे घोषणा केली जाते. ...सविस्तर बातमी
16:36 (IST) 14 Aug 2025

टिटवाळ्यात १०८ रुग्णवाहिका चालकाची मनमानी, रुग्णाला मुंबईत केईएमला नेण्यास नकार

रुग्णवाहिका उपलब्ध झाली तरी काही वेळा रुग्णवाहिका चालक मनमानी करून रुग्ण रुग्णालयात नेण्यास विविध कारणे देऊन टंगळमंगळ करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. टिटवाळा इंदिरानगर भागात गुरूवारी असाच प्रकार उघडकीला आला आहे. ...वाचा सविस्तर
16:27 (IST) 14 Aug 2025

नाशिक : म्हाळसाकोरे दरोड्यातील तीन संशयित ताब्यात

म्हाळसाकोरे शिवारात चोरट्यांनी राजेंद्र मुरकुटे यांच्या घरात प्रवेश करून कुटूंबियांना कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, कपाटातील पैसे असा तीन लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ...सविस्तर वाचा
16:18 (IST) 14 Aug 2025

व्हॉईस ऑफ देवेंद्र स्पर्धा घेण्यावर आयोजक ठाम

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय व्हॉईस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा होणारच असून १५ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत सहभागासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे ...वाचा सविस्तर
16:15 (IST) 14 Aug 2025

सोलापुरात ‘सिटू’ने ट्रम्प यांचा पुतळा जाळला

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात पोलीस आणि आंदोलन कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. ...वाचा सविस्तर
16:05 (IST) 14 Aug 2025

वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने चौघांना जीवनगौरव पुरस्कार

वि. गु. शिवदारे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी वैद्यकीय, समाजकार्य, शेती आणि पत्रकारिता या विषयात कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. ...वाचा सविस्तर
15:46 (IST) 14 Aug 2025

स्वातंत्र्य तर वृध्द झाले, सुराज्य कधी येईल डोंबिवलीतील सुजाण नागरिकांनो? डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या फलकाची जोरदार चर्चा

डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या फलकावरून संदेश - ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही सुराज्य दूर, आता सुजाण नागरिकांनीच पुढाकार घ्यावा. ...अधिक वाचा
15:31 (IST) 14 Aug 2025

शहापूरच्या महिला सरपंच ''लाल किल्ल्यावर प्रमुख'' पाहुण्या !

देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडक २१० ग्रामपंचायत सरपंचांची या सन्मानासाठी निवड झाली असून, महाराष्ट्रातून १५जणांचा समावेश आहे. ...अधिक वाचा
15:21 (IST) 14 Aug 2025

नवी मुंबई विमानतळाच्या फलकावर काळे फासल्याने गुन्हा दाखल

सरकारी मालमत्तेचे नूकसान केल्यामुळे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्याकडे बुधवारी पनवेल महापालिकेच्या कर्मचा-यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ४ ते ५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
14:52 (IST) 14 Aug 2025
"घर असावे घरासारखे... नकोत नुसत्या भिंती..!"; बीडीडी चाळीतील नव्या घरांच्या पाहाणीनंतर एकनाथ शिंदेंची पोस्ट

"घर असावे घरासारखे... नकोत नुसत्या भिंती..! बीडीडी वासियांसाठी तयार करण्यात आलेल्या वरळी येथील नवीन घरांची आज पाहणी केली. याठिकाणी अतिशय सुसज्ज आणि सुंदर इमारती उभारण्यात आल्या असून चाळीत १० × १० च्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी वासियांना आता ५०० स्क्वेअर फुटांची २ bhk घरे मिळणार आहेत. मुंबईतील मुंबईकरांना मुंबई बाहेर न जाता त्याला इथेच त्याला चांगले घर मिळावे हे जे स्वप्न आम्ही पाहिले, त्याची पूर्तता केल्याचे समाधान आज आम्हाला वाटले आहे."

"यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद बोरीकर आणि बीडीडी चाळीतील रहिवाशी यावेळी उपस्थित होते," असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

14:30 (IST) 14 Aug 2025

बुबुळांची प्रतिमेद्वारे लिव्ह ॲण्ड लायसन्स करारनाम्यांची दस्त नोंदणी

भाडेकरारासाठी वापरण्यात येत असलेल्या २.० संगणक प्रणालीद्वारे आधार पत्रिकेची पडताळणी करताना हाताचे ठसे घ्यावे लागतात. मात्र अनेकवेळा काही ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे उमटत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा