Maharashtra Political Crisis Live Updates in Marathi : राज्यातील सत्तासंघर्ष सुरु असून शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना सुरु आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून १ ऑगस्टला यासंबंधी सुनावणी होणार आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाकडून आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांकडून राहुल शेवाळेंची गटनेतेपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाला या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे.

तेलंगणातील मेडीगट्टा धरणामुळे सिरोंच्या तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे. सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. या गावातील २०६ कुटुंबांनी महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साहाय्याने तिथेच तंबू उभारून वास्तव्याला सुरुवात केली आहे. राज्यातील अशा विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर…

article 18 in constitution of india abolition of titles zws
संविधानभान : ना गादी ना संस्थानिक; येथे सारेच नागरिक!
indian constitution to
संविधानभान: एकलव्याच्या अंगठय़ाचे रक्षण
dual voters telangana maharashtra border
Loksabha Election 2024: महाराष्ट्र-तेलंगणा: ‘या’ १४ गावांतील लोक दोन राज्यात बजावतील मतदानाचा हक्क, नेमके प्रकरण काय?
Neglect of Tribal and OBC Issues Voters Angers on congress and bjp in Gadchiroli Chimur
गडचिरोली : निवडणुकीतून आदिवासी, ओबीसींचे प्रश्नच बाद ? समाजात नाराजीचा सूर
Live Updates

Maharashtra Latest News Today : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि विविध बातम्यांचे अपडेट एका क्लिकवर...

21:56 (IST) 28 Jul 2022
मनोहर जोशींना भेट देऊन येताच एकनाथ शिंदेंनी सांगितले 'भेटसत्राचे' नेमके कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे शिवसेना पक्षवर्चस्वावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरु असताना दुसरीकडे शिंदेंनी या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डहाके यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचीही सदिच्छा भेट घेतली. मनोहर जोशी यांना भेटून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या भेटसत्राचे नेमके सांगितले आहे. या भेटींमागे कोणताही राजकीय होतू नाही. ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद मिळावेत याच उद्देशाने मी मनोहर जेशी यांची भेट घेतली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर

20:00 (IST) 28 Jul 2022
जाणून घ्या शिवसेनेतील संघर्ष आणि निवडणूक आयोगाची भूमिका

शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला असून शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद काय? निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा काय परीणाम होणार? तसेच निवडणूक आयोग कोणत्या आधारावर हा निर्णय घेणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. वाचा सविस्तर

19:31 (IST) 28 Jul 2022
पुणे : गळफास लावून घेत पोलिसाची आत्महत्या

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर येथे घडली. हवालदार सुनील नारायण शिंदे (वय ५०, रा. गल्ली क्र. एक गणराजपार्क, कवडी माळवाडी कदमवस्ती ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

19:29 (IST) 28 Jul 2022
पुणे : अपशब्द वापरले म्हणून कोयत्याने वार करून खून ; दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोघे ताब्यात

पत्नीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणातून मित्राच्या साथीने दोघांनी एका व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आखाड पार्टी साजरी करण्यासाठी बोलावून वादावादीतून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सविस्तर वाचा

19:12 (IST) 28 Jul 2022
पुणे : संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चे वेळापत्रक एमपीएससीकडून जाहीर

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट)  फेटाळण्यात आल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले.

सविस्तर वाचा

18:45 (IST) 28 Jul 2022
गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धुडेशिवणी जंगल परिसरात खुशाल निकुरे (६०) या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. व्याघ्र हल्ल्यातील मृत्यूची ४८ तासातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा

18:38 (IST) 28 Jul 2022
चंद्रपूर : मंत्रिमंडळ अस्तित्वात न आल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर ; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला असला तरी पूरग्रस्त भागाचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून काम करणे, मंत्रिमंडळ गठित करून ३७ जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देणे, त्यांना जिल्ह्यात ठाण मांडून बसायला सांगायला हवे.

सविस्तर वाचा

18:21 (IST) 28 Jul 2022
ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमु‌ळे आणखी एकाचा मृत्यु ; जिल्ह्यात मृत्युची संख्या तीन वर पोहचली

जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांपाठोपाठ आता मिरा-भाईंदर, नवी मुंबई, अंबरनाथ आणि ग्रामीण भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ६६ रुग्णांपैकी ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सविस्तर वाचा

18:17 (IST) 28 Jul 2022
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नको- छगन भुजबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. राज्यातील ९१ नगरापालिकांच्या निवणडणुका ओबीसी आरक्षणाविनाच घेण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालायाने दिले. त्यानंतर भुजबळ यांनी ही मागणी केली.

17:59 (IST) 28 Jul 2022
शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

आज मुंबई येते फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तथा प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोबवली. त्यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले आहे. ठाकरेंनी ही घोषणा सर्वांसमोरच केली आहे. वाचा सविस्तर

17:52 (IST) 28 Jul 2022
ठाणे : मुंब्य्रातील अलिशान सोसायटीमधील १७ वीज मीटरमध्ये छेडछाड

शीळ, मुंब्रा तसेच कळवा भागातील तीस हजारहून अधिक ग्राहकांचा वीज वापर कमी असल्याची नोंद गेल्या महिनाभरापासून होत असून अशा संशयास्पद विद्युत मीटरची तपासणी टोरेंट कंपनीच्या पथकाने सुरु केली आहे. या तपासणीदरम्यान मुंब्रा येथील कौसा भागातील मलिक रेसिडेन्सी या आलिशान इमारतीत १७ विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी होत असल्याचे पथकाला आढळून आले आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकांवर वीज कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:39 (IST) 28 Jul 2022
नागपूर : नियमबाह्यपणे घरगुती सिलिंडरचा वाहनांमध्ये वापर

घरगुती सिलिंडरमधील ‘एलपीजी’ अवैधरित्या चारचाकी वाहनांमध्ये वापरण्याचा प्रकार नागपूर शहरात सर्रासपणे सुरू असून याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. यामुळे अपघात होऊन प्राणहानी होण्याची भीती आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:27 (IST) 28 Jul 2022
कल्याणमधील बालक मंदिर शाळेत दीपोत्सव

दीप अमावास्येच्या निमित्ताने कल्याण मधील बालक मंदिर शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक कलाकुसरी करून विद्यार्थ्यांनी जुन्या जमान्यातील, नवीन दिव्यांची आरास करून दीप प्रज्वलित केले होते. आकर्षक मनोहरी दृश्य या उत्सवामुळे निर्माण झाले होते. मराठी, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

सविस्तर वाचा

17:16 (IST) 28 Jul 2022
पिंपरी: सफाई कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न दिल्यास प्रतिदिन २५ हजाराचा दंड ; पिंपरी पालिकेचा ठेकेदारी संस्थांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय

शहरातील रस्ते, गटारांची सफाई करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न देणाऱ्या ठेकेदारी संस्थांवर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास संबंधित ठेकेदारांकडून प्रतिदिन २५ हजार रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

17:02 (IST) 28 Jul 2022
ठाणे पोलिसांनी ११४ तळीरामांसह सह प्रवाशांची झिंग उतरवली ; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत सहाजणांना अटक

ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात बुधवारी रात्री गटारीनिमित्ताने मद्याच्या पार्ट्या झोडून वाहने चालविणारे तळीराम आणि त्यांच्यासोबत असलेल्या सह प्रवाशी अशा एकूण ११४ जणांची पोलिसांनी झिंग उतरवली आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.

सविस्तर वाचा

16:50 (IST) 28 Jul 2022
कांदिवलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू ; डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार

कांदिवली पूर्व येथे आज (गुरुवार) २७ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून, महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलीस व्यक्त केला आहे. याप्रकरणी कुरार पोलीस अधिक तपास करीत आहेत. वाचा सविस्तर बातमी...

16:50 (IST) 28 Jul 2022
पुणे : १२७८ डास उत्पत्ती स्थळांना नोटीसा

डेंग्यू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शहरात १ हजार २२८ डास उत्पत्ती स्थळे आढळून आली असून त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा

16:42 (IST) 28 Jul 2022
शहरातील २८ टक्के नागरिक झोपडपट्टीत वास्तव्य

शहरातील २८ लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये रहात असून एकूण अधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या ३९० एवढी आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याचे नियोजित आहे. महापालिकेच्या २०२१-२२ या वर्षीच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून ही वस्तुस्थिती पुढे आली आहे.

सविस्तर वाचा

16:32 (IST) 28 Jul 2022
कुलूप दुरुस्तीच्या बहाण्याने सहा लाखांचा गंडा

कपाटाचे कुलूप दुरुस्त करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी लोखंडी स्क्रू आणण्यासाठी मालकिणीला घराबाहेर पाठवून तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास करून गंडा घातला आहे. ताडीवाला रस्ता परिसरात मंगळवारी (२६ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

सविस्तर वाचा

16:30 (IST) 28 Jul 2022
बंगल्यात चोरी करणाऱ्याला अटक ; १० लाखांचा ऐवज जप्त

मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने अलिशान बंगल्यात चोरी करणाऱ्याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सविस्तर वाचा

16:30 (IST) 28 Jul 2022
ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढून आरक्षण निश्चित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

16:25 (IST) 28 Jul 2022
सुबोध जयस्वाल यांच्या सीबीआय संचालकपदीच्या नियुक्तीचे प्रकरण : मुख्य न्यायमूर्तींची प्रकरणातून माघार

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांच्या सीबीआय संचालकपदी झालेल्या नियुक्तीला आव्हान देणारे प्रकरण ऐकण्यापासून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी (आज) गुरुवारी स्वतःला दूर ठेवले. याचिकाकर्त्याने आपल्याविरोधात सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याने आपण हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर बातमी...

16:18 (IST) 28 Jul 2022
ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढून आरक्षण निश्चित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

16:01 (IST) 28 Jul 2022
४०० अध्यादेश काढता, पण एक समिती स्थापन करण्यासाठी वेळ नाही? – उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

इमारतींमधील अग्निसुरक्षा नियमांना अंतिम रूप देऊन त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणती पावले उचलली हे स्पष्ट करण्याचे आदेश साडेतीन महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. त्यानंतरही या नियमांची अंमलबजावणी कशी करावी याची शिफारस करणारी समिती स्थापन करण्यात आलेली नाही. यावरून उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्य सरकारला धारेवर धरले. सरकार ४०० अध्यादेश काढू शकते, पण अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करू शकत नाही?, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले. वाचा सविस्तर बातमी...

15:56 (IST) 28 Jul 2022
सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये जोरदार खडाजंगी, सुप्रिया सुळेंना करावी लागली मध्यस्थी

लोकसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी आमने-सामने आल्याने मोठा वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसहित इतर महिला खासदारांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र यामुळे काही काळासाठी सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेलं वादग्रस्त विधान या वादासाठी कारणीभूत ठरलं.

सविस्तर बातमी

15:47 (IST) 28 Jul 2022
राज्यात सध्या दोन जणांचं अपंग मंत्रिमंडळ - नाना पटोले

राज्यात सध्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या दोन जणांचं अपंग मंत्रिमंडळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्याचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व प्रकारावर महामहीम राज्यपाल शांत का आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

सविस्तर वाचा..

15:44 (IST) 28 Jul 2022
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर

महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना शि‌वशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  वाचा सविस्तर बातमी...

15:41 (IST) 28 Jul 2022
कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्याची दुर्दशा ; खड्डयांमुळे प्रवासी हैराण

कल्याण पूर्वेतील नेतिवली ते मलंग गड १०० फुटी रुंद रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या वर्दळीच्या रस्त्यावर दररोज सकाळी, संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक होते.

सविस्तर वाचा

15:31 (IST) 28 Jul 2022
अंबरनाथ, बदलापुरात ओबीसी आरक्षण सोडत पूर्ण ; काहींना फायदा तर काहींना नुकसान,आरक्षणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया

अंबरनाथ आणि बदलापूर या अ वर्ग नगरपालिकांमध्ये अनुक्रमे १४ आणि १३ ओबीसी जागांची सोडत प्रक्रिया गुरूवारी पूर्ण झाली. यावेळी सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला आणि ओबीसी सर्वसाधारण आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले.

सविस्तर वाचा

15:29 (IST) 28 Jul 2022
साथीच्या आजाराने केले डोकेवर ; दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली

एकीकडे स्वाईन फ्ल्यू चा धोका तर, दुसरीकडे वातावरण बदलामुळे साथीच्या आजारानेही डोके वर काढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.

सविस्तर वाचा

15:06 (IST) 28 Jul 2022
ओवळा-माजिवडा मतदारसंघात बनणार ५ फुटबॉल प्रशिक्षण केंद्र ; राज्य शासनाकडून निधी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत

ओवळा-माजिवडा मतदारसंघात ५ फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारणीस राज्य शासनाने मान्यता दिली असून प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे ५ कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाने ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग केला आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महापालिकेच्या माध्यमातून फुटबॉलचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सविस्तर वाचा

15:06 (IST) 28 Jul 2022
कडोंमपा संगणकीकरणाचा ऑनलाईन गोंधळ कायम ; मालमत्ता कर वसुलीवर परिणाम, करदाते, कर्मचारी त्रस्त

लोकांना तत्पर सेवा देता यावी या उद्देशातून तयार केलेली कल्याण डोंबिवली पालिकेतील संगणकीकरणाची ऑनलाईन सेवा उन्नत्तीकरणाच्या नावाखाली विस्कटून टाकण्यात आली आहे. पालिका अधिकाऱ्यां बरोबर करदाते नागरिक त्रस्त आहेत.उन्नत्तीकरणाच्या नावाखाली मार्च ते एप्रिल ही सेवा संथगतीने, कधी ठप्प पध्दतीने काम करत होती.

सविस्तर वाचा

15:05 (IST) 28 Jul 2022
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल ; बीएसयूपी योजनेत घर मिळवून देतो असे सांगून फसवणूक

राष्ट्रवादी कॉग्रेसचा पदाधिकारी सौरभ वर्तक याच्याविरोधात अडीच लाख रूपयांच्या फसवणूकी प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएसयूपी योजनेत घर मिळवून देतो असे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. सौरभ विरोधात यापूर्वीही फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 28 Jul 2022
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद ; वारंवार जिना बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल

डोंबिवली आठवड्यातून दोन ते तीन वेळा बंद पडत असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील जिना सुस्थितीत चालू राहिल अशी कोणतीही व्यवस्था मध्य रेल्वे प्रशासनाकडून केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 28 Jul 2022
रस्ते अडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल ; उल्हासनगरात वाहनचालक, गॅरेज चालकांवर गुन्हे

रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून माल उतरवणे, गॅरेजमधील वाहनांची रस्त्यावर दुरूस्ती करणे आणि अवजड वाहने रस्त्यावर उभी करणे अशा विविध कारणांनी वाहतुकीसाठी महत्वाचे रस्ते अडवणाऱ्यांवर उल्हासनगर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

सविस्तर वाचा

15:03 (IST) 28 Jul 2022
रेती लिलाव शून्य प्रतिसाद ; रेती व्यावसायिकांना अधिकृत परवाना नकोच !

जानेवारी महिन्यात राज्य शासनाने रेतीचे शासकीय दर कमी केले होते. या कमी दरानुसार जिल्हा रेती गट विभागाने रेती लिलावाच्या नव्याने निविदा जाहीर केल्या होत्या. दर कमी झाल्याने व्यावसायिक यात सहभागी होतील अशी खात्री जिल्हा महसूल विभागाला होती. परंतु, रेती व्यावसायिकांनी याकडेही सपशेल पाठ फिरवली आहे.

सविस्तर वाचा

15:02 (IST) 28 Jul 2022
कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी शरद पाटील

कल्याण पूर्वेतील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक शरद पाटील यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुख पदी निवड केली. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शरद पाटील यांची ओळख आहे.

सविस्तर वाचा

15:02 (IST) 28 Jul 2022
कल्याण : महावितरणची वीज देयक भरणा केंद्रे शनिवार, रविवार सुरू

महावितरणच्या वीज ग्राहकांना वीज देयकाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जुलै अखेर शनिवारी, रविवारी (३० व ३१ जुलै) वीज देयक भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा

14:37 (IST) 28 Jul 2022
पुणे शहरात वाहने ३३ लाखांपुढे; नव्या वाहनांची भर कायम

पुणे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची वस्तुस्थिती महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे. जून महिन्याअखेरपर्यंत शहरात ३३ लाख २४ हजार ५८२ एवढी वाहनांची नोंद असून, वर्षभरात (२०२० ते २०२१) १ लाख ७० हजार ११५ एवढ्या नव्या वाहनांची नोंद झाली आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता माणशी एक वाहन असेच चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे. २०१९ ते २०२० या कालावधीत १ लाख ५० हजार ४८४ नव्या वाहनांची नोंद झाली होती. वाचा सविस्तर बातमी....

14:26 (IST) 28 Jul 2022
नागपूर : फेसबुकवरून मैत्रीकरून तरुणीचे लैंगिक शोषण; प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

फेसबुकवरून मैत्री करून तरूणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रियकर तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हेमंत मनोहर मेश्राम (२८, शुभम कॉलनी, यवतमाळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:15 (IST) 28 Jul 2022
पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे सुनील नारायण शिंदे या कर्मचाऱ्यानी लोणी काळभोर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:13 (IST) 28 Jul 2022
Monkeypox Cases Rise: सेक्स पार्टनर्सची संख्या कमी करा, मंकीपॉक्सला रोखण्यासाठी WHO चा सल्ला

करोनानंतर जगभरात सध्या मंकीपॉक्स आजाराने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने पुरुषांना मंकीपॉक्सची लागण होण्याचा धोका जास्त असून, सेक्स पार्टनरची संख्या कमी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही माहिती दिली आहे. नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

सविस्तर बातमी

14:05 (IST) 28 Jul 2022
अकोला : शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांना घरातूनच धक्का; बंधू संजय जाधव शिवसेनेतच!

एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना त्यांच्या घरातूनच मोठा धक्का बसला आहे. कारण, प्रतापराव जाधव यांचे धाकटे बंधू, मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गटनेता संजय जाधव यांनी आपण अजूनही मूळ शिवसेनेतच असल्याचे जाहीर केले आहे. प्रतापराव जाधव यांना बंडखोरीत घरातूनच साथ न मिळाल्याने राजकीय वर्तुळात हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. वाचा सविस्तर बातमी..

13:47 (IST) 28 Jul 2022
गोंदिया : नवेगावबांधजवळ भीषण कार अपघात; चार ठार, एक जखमी

गोंदियामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधजवळ ग्राम खोबा येथे काल (बुधवार) रात्री ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाचा अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:35 (IST) 28 Jul 2022
दोन वर्षांनी भरणार वांद्रे येथील ‘माऊंट मेरी जत्रा’ ; ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजन

गेल्या दोन वर्षांपासून करोना, टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे होऊ न शकलेल्या वांद्रे येथील माऊंट मेरी जत्रेचे यंदा ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर सगळे सण, उत्सव निर्बंधमुक्त झाले असून उत्सवप्रेमींची लगबग सुरू झाली आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:42 (IST) 28 Jul 2022
महाराष्ट्र सदन प्रकरण : सार्वजनिक विभागाच्या तत्कालिन सचिवाला आरोप निश्चितीपासून तूर्त दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून आपल्यालाही दोषमुक्त करण्यात यावे या मागणीसाठी सार्वजनिक विभागाचे तत्कालिन सचिव आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली असून खटल्याला गैरहजर राहण्यास त्यांना दिलेली मुभा आज (गुरुवारी) कायम ठेवली. तसेच देशपांडे यांना आरोप निश्चितीपासून दिलासा दिला. वाचा सविस्तर बातमी...

12:33 (IST) 28 Jul 2022
मंत्रीमंडळ विस्तारावरून फडणवीसांचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद? अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. पण अद्याप या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलं आहे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना यावेळी मंत्रीपद देऊ नये, असं अमित शाह किंवा केंद्रातील भाजपाच्या हायकमांडचं म्हणणं आहे, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

सविस्तर बातमी

12:26 (IST) 28 Jul 2022
नागपूरच्या उमरेडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; नऊ आरोपींना अटक

एका १२ वर्षीय मुलीवर तब्बल ९ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उमरेडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणाना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १२ वर्षांची मुलीचे आई-वडिल शेतमजुर आहेत. वाचा सविस्तर बातमी...

12:18 (IST) 28 Jul 2022
एकनाथ शिंदेंच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुन संजय राऊतांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवतील असा टोला त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. हा त्यांचा सहावा दिल्ली दौरा होता. मात्र रात्री अचानक हा दौरा रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नसल्याने एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं बोललं जात होतं.

सविस्तर बातमी

12:14 (IST) 28 Jul 2022
महाराष्ट्रात सत्तांतर होणार म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “त्यांना स्वप्नातच…”

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकीत वर्तवलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांना स्वप्नातच राहू द्या असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर बातमी

Maharashtra Political News Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स