Maharashtra News Highlights: मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, धाराशिव, अकोला व रायगडसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपलं आहे. या पावसामुळे पुणे-बंगळुरू महामार्गाला नदीचं स्वरुप आलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर, वादळी वाऱ्याचा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्याला मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई व ठाण्याला यल्लो अलर्ट तर पुणे व कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगलीलाही यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल.

दरम्यान, करोनाने मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात बुधवारी करोनाचे २६ रुग्ण आळढले असून एकूण रुग्णसंख्या १३२ वर पोहोचली आहे. राज्यात सर्वाधिक २५ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. दुसऱ्या बाजूला पुण्यातील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. यासह राजकीय घडामोडींवरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live Today : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.

17:30 (IST) 22 May 2025

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, "मुलीला नांदवायचे नव्हते तर…"

Vaishnavi Hagawane Case: सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. ...अधिक वाचा
16:49 (IST) 22 May 2025

मंत्रालयात पेशवाईसारखे वातावरण; धुळ्यातील घटनेवरून बच्चू कडू यांची टीका

धुळ्यातील घटनाक्रमाशी समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे नाव जोडले जात आहे. शासकीय विश्रामगृहातील खोली खोतकर यांच्या खासगी स्वीय सहायकाच्या नावे आरक्षित होती ...सविस्तर बातमी
16:36 (IST) 22 May 2025

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आमदार रोहित पवारांचं भाष्य

मुलीच्या बापाने दिलेल्या हुंड्याच्या जीवावर जगणारी जमात ही स्वतःमध्ये हिंमत नसलेले षंढ, बांडगुळ आणि एक नंबरचे भिकारी असतात. हुंडा मागणाऱ्याला हुंडा तर नाहीच पण यापुढं कोणत्याही आई-वडीलांनी आपली मुलगीही दिली नाही पाहिजे. तसंच ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ ही राज्य सरकारने सुरु केलेली मोहिम थंडावली असून ती पुन्हा अधिक जोमाने राबवून लोकांपर्यंत पोचवली तर भविष्यात अनेक ‘वैष्णवीं’चा जीव वाचेल…

16:35 (IST) 22 May 2025
16:18 (IST) 22 May 2025

कल्याणमधील इमारत दुर्घटनेतील रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी

या इमारतीमधील सहा कुटुंबीयांच्या घरात अंत्येष्टीचे विधी आहेत. तरीही हे रहिवासी शोकाकुल अवस्थेत पालिकेत आले आहेत. ...अधिक वाचा
15:19 (IST) 22 May 2025

आंबोली घाट रस्त्यावर दरड कोसळली;वाहतूक कोंडी, बांधकाम विभागाने रस्ता केला पुर्ववत

सावंतवाडी तालुक्यात आज सकाळी आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे घडलेल्या या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ काम करून वाहतूक पूर्ववत केली. ...सविस्तर बातमी
15:17 (IST) 22 May 2025

नाशिक : जिल्हा आरोग्य विभागास नव्याने १९ रुग्णवाहिका, एचएएलची सामाजिक दायित्व निधीतून मदत

नव्याने आलेल्या रुग्णवाहिकांमुळे आरोग्य विभागाची आपत्कालीन सेवांची उपलब्धता मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ...अधिक वाचा
15:13 (IST) 22 May 2025

"भविष्यात असा निर्घृणपणा करण्याचं कोणाचं धाडस होऊ नये यासाठी...", वैष्णवी हगवणेच्या पालकांना भेटल्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मयत वैष्णवी हगवणे हिच्या पालकांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सामंत म्हणाले, "हा नीचपणाचा कळस आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन जण फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढच्या २४ तासांत उरलेले दोन आरोपी गजाआड दिसतील. पोलिसांना त्या आरोपींना पकडण्यात यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. भविष्यात असा निर्घृणपणा, नीचपणा करण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशी शिक्षा आरोपींना व्हायला हवी. यासाठी पोलिसांनी पुरावे गोळा करून खटला चालू करावा अशा सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत".

15:02 (IST) 22 May 2025

युतीसाठी राज व उद्धव ठाकरे थेट चर्चा करणार? राऊत म्हणाले, "आम्हाला स्पष्ट सांगितलंय…"

Sanjay Raut on Raj and Uddhav Thackeray : शिवसेनेने योग्य तो प्रस्ताव पाठवावा, "आम्ही देखील शिवसेनेबरोबर (ठाकरे) युतीसाठी सकारात्मक आहोत", अशी प्रतिक्रिया मनसेने दिली आहे. ...सविस्तर बातमी
13:24 (IST) 22 May 2025

जून महिन्यात येणाऱ्या रानभाज्या, मे महिन्यातच अवकाळी पावसामुळे विक्रीसाठी आल्या बाजारात

दरवर्षी मृगाच्या पावसामध्ये उगवणारी रानभाजी यंदा अवकाळी पावसामुळे लवकर उगवली असून त्या विक्रीसाठी बाजारात येऊ लागली आहे. ...वाचा सविस्तर
12:36 (IST) 22 May 2025

ठाण्यात सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळली

ठाण्यात वागळे इस्टेट भागात एका कंपनीची सुरक्षा भिंत पावसादरम्यान कोसळली. या घटनेत तिन्ही वाहने नुकसानग्रस्त झाली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने कारवाई करून परिसर रिकामा केला. ...वाचा सविस्तर
12:26 (IST) 22 May 2025

"आम्ही प्रतिसाद दिला, आता राज ठाकरे…", मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर अनिल परबांचं सूचक वक्तव्य

Anil Parab on Shivsena UBT - MNS Alliance : आम्ही मनसेबरोबरच्या युतीसाठी सकारात्मक असून आम्ही तसा प्रतिसाद दिला आहे, असं शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी म्हटलं आहे. ...अधिक वाचा
12:21 (IST) 22 May 2025

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महाग, सोमवारपासून २५ रुपये दरवाढ

मोरा ते भाऊचा धक्का या जलमार्गावरील प्रवास आता २५ रुपयांनी महागणार, तिकीट दर ८० ऐवजी १०५ रुपये होणार आहे.ही दरवाढ पावसाळ्यामुळे अनियमित प्रवासाच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. ...अधिक वाचा
12:07 (IST) 22 May 2025

महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी  वीजसमस्यांवर उपाययोजना; वृक्ष छाटणी यासह विविध तांत्रिक दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर

अनेक ठिकाणी मोनोपोल टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः हे मोनोपोल खारभूमीच्या ठिकाणी टाकले जाणार आहेत.  ...अधिक वाचा
11:53 (IST) 22 May 2025

धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या रकमेबाबत आमदार अर्जुन खोतकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "माझे पीए..."

धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेच्या घटनेवर अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अनिल गोटे व संजय राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ते म्हणाले हा विरोधकांचा डाव आहे. माजे स्वीय सहाय्यक त्या रूममध्ये राहत नव्हते. तो बाजूच्या रूममध्ये राहत होते. माजी आमदार अनिल गोटे यांची आरोप करण्याची जुनी सवय आहे. सरकारला, अंदाज समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे.

11:49 (IST) 22 May 2025

राहाता : बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू, आठवड्यात दुसरी घटना

या घटनेची माहिती समजताच स्थानिक युवकांनी दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. ...वाचा सविस्तर
11:42 (IST) 22 May 2025

अहिल्यानगर : कोल्हार परिसरात महिन्यात ४ बिबटे जेरबंद

परिसरात आणखी काही बिबटे असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने वन विभागाने या भागात पुन्हा पिंजरा लावला आहे. ...सविस्तर वाचा
11:24 (IST) 22 May 2025

'ऑपरेशन सिंदूर'मधून आत्मनिर्भर भारताचे दर्शन - राधाकृष्ण विखे

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीबद्दल सीमेवरील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...सविस्तर बातमी
11:03 (IST) 22 May 2025

चौंडीतील अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

यापूर्वी सन १९९६ मध्ये राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा चौंडी येथे अहिल्यादेवी यांच्या २०१ व्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. ...अधिक वाचा
11:01 (IST) 22 May 2025

"आमदारांचा मलिदा, धुळ्याच्या विश्रामगृहात ५.५ कोटी, शिवसैनिकांच्या धडकेनंतर मंत्र्यांचे पीए पळाले", राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut on Dhule Guest House : विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती बुधवारी (२१ मे) धुळे जिल्हा दौऱ्यावर होती. ...अधिक वाचा
10:39 (IST) 22 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण; मार्ग सुकर, प्रवाशांना दिलासा

या पत्रामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्याचा मार्ग सुकर झाला असून, यामुळे कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. ...वाचा सविस्तर
10:39 (IST) 22 May 2025

रांजणपाडा गावासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

अतिसारामुळे नागरिकांना अशक्तपणाच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या डॉक्टर व त्यांच्या पथकाने अनेक रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ...वाचा सविस्तर
10:21 (IST) 22 May 2025

“आम्ही प्रतिसाद दिला, आता राज ठाकरे…”, मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर अनिल परबांचं सूचक वक्तव्य

शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब म्हणाले, "शिवसेना (उबाठा) राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करण्यासाठी सकारात्मक आहे. आम्ही तसा प्रतिसाद राज ठाकरे यांना दिला आहे. आता राज ठाकरे यांनी ठरवाचं आहे की कोणाशी युती करायची आणि कोणाशी युती करू नये. त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा".