Maharashtra Politics News Updates, 05 August 2025 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. माणिकराव कोकाटेंचं ‘रमी’ प्रकरणावरून कृषीमंत्रीपद काढून घेण्यात आलं. पण त्यांना क्रीडामंत्रीपद देऊन लगेच पुनर्वसनही करण्यात आलं. विरोधकांकडून यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे कोल्हापुरातील महादेवी हत्तीण वनतारा येथे गेल्यानंतर त्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मनसे-उद्धव ठाकरे युतीच्या चर्चा यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.
Maharashtra Political News Updates 05 August: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा आढावा...
“ती कबूतरं आहेत, शिंदेंचे आमदार नव्हे”, ‘त्या’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांची फिरकी
Aditya Thackeray on Kabutar Khana & Devendra Fadnavis : मुंबईमधील दादर येथील कबुतरखाना बंद करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईवरून जैन समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. या कारवाईमुळे जैन समाज भाजपावर नाराज आहे. विकासकांच्या दबावाखाली राज्य सरकारने असा निर्णय घेतल्याचा आरोप जैन नागरिक करू लागले आहेत. दरम्यान, जैन समाजाच्या दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रश्न सोडवण्यासाठी आज (५ ऑगस्ट) संबंधित लोकांची बैठक बोलावली होती. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोवर येथील कबूतरांना कंट्रोल्ड फीडिंग करावं (नियंत्रित खाद्यपुरवठा) असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. दरम्यान, फडणवीसांचा हा सल्ला ऐकून शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
High Court : मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आता फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स चार्जेस द्यावा लागणार
भावली धरणातील पाण्याच्या लाटा…शहापूर विरोधातील नौकेत हेमंत गोडसेंसह शिवसेनेचे पदाधिकारी
Local Bodies Elections: महाराष्ट्रात दिवाळीनंतर निवडणुका - निवडणूक आयोग
महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच, या निवडणुका एकाच टप्प्यात न होता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
नाशिक : अवजड वाहतुकीवरील निर्बंधामुळे पेच; जिल्हा वाहतूकदार संघटनेची नाराजी
‘पॅनल’ मजबुतीकरणावर सर्वपक्षीय भर; महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
जळगावात सोन्याचा दणका… दरात पुन्हा ‘इतकी’ वाढ
पिंपरी- चिंचवड: बेरोजगारीतून चोरीचा प्रयत्न; तरुणांच्या धाडसाने चोरटा जेरबंद; चोरटा पार्सल आल्याचं सांगत घरात शिरला
सातशे विद्यार्थ्यांकडून 'एक पेड़ माँ के नाम'; श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपूर्ती
कराडच्या प्रीतिसंगमावर मगरीची दहशत कायम; सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
महादेवी हत्ती परत करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार - देवेंद्र फडणवीस
सोलापूर जिल्ह्यात लम्पीची साथ; ३७ जनावरे मृत्युमुखी; ४३९ बाधित
राज्यातील धरणांमध्ये जुलैअखेर तुडूंब; जाणून घ्या, पाणीसाठा किती?सर्वाधिक पाऊस कुठे पडला?
Pratap Sarnaik on Parinay Phuke: 'शिवसेनेचा मीच बाप' विधानावर प्रताप सरनाईकांचं परिणय फुकेंना उत्तर
आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व शिवसैनिकांना हे माहिती आहे. आमचा बाप कुणी काढायची गरज नाही. त्यांचा बाप कोण असेल ते त्यांनी सांगावं. आमच्या पक्षाबद्दल त्यांनी बोलायची गरज नाहीये. परिणय फुके अतिशय चांगले, विद्वान नेते आहेत. तरुण, तडफदार नेते म्हणून ते विदर्भात परिचित आहेत. त्यांनी अशा प्रकारे महायुतीतील घटकपक्षाबद्दल बोलणं योग्य नाही - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
"ठाकरे बंधूना मुंबईत चांगले यश"…असे कोणते मातब्बर मंत्री म्हणाले? राजकारणात खळबळ का उडाली?
बार्शीत बनावट नोटा प्रकरणी सात जणांना सक्तमजुरी
जळगावात नाभिक समाज मेळावा… शासनाच्या उदासीन भूमिकेवर जोरदार टीका
जालन्यात बुलेटच्या कर्णकर्कश सायलेन्सरविरुद्ध पोलिसांची मोहीम
Mahadevi Elephant News: महादेवी हत्तिणीबाबतच्या बैठकीचं शाहू महाराज यांना निमंत्रण नाही
महादेवी हत्तिणीला कोल्हापूरला परत आणलं पाहिजे. आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याचं मी ऐकलं. पण मला या बैठकीचं निमंत्रण नव्हतं - शाहू महाराज
Mahadevi Elephant News: राज्य सरकार नांदणी मठासोबत न्यायालयात जाणार
महादेवी हत्तिणीला कोल्हापूरला परत आणण्यासंदर्भात न्यायालयात सरकार नांदणी मठासोबत सहयाचिकाकर्ते होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत दिल्याचं सांगितलं जात आहे.
Mahadevi Elephant News: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
माधुरी उर्फ महादेवी हत्तिणीला गुजरातच्या वनतारामधून पुन्हा कोल्हापुरात आणण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे. यासंदर्भात सरकारकडून आश्वासक पावलं उचलण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
DCM Eknath Shinde in Delhi: एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले असून त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात नेमक्या कुणाशी भेटीगाठी होणार? याचे अंदाज बांधले जात आहेत. राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील आपले स्थान व त्याअनुषंगाने जागावाटपामध्ये घेतली जाणारी भूमिका यासंदर्भात या भेटीगाठी होत असल्याचं बोललं जात आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. (संग्रहित छायाचित्र)
Maharashtra Political News Updates 05 August: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा...