Maharashtra Political Crisis Today, 10 July: महाराष्ट्रातल्या राजकारणात २ जुलैपासून उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड करुन शरद पवारांविरोधातच दंड थोपटले आहेत. तर शरद पवार यांनी कुणावरही टीका करणार नाही, नव्या जोमाने पक्ष बांधणी करणार असं म्हणत पुन्हा एकदा मैदानात उतरुन तयारी सुरु आहे. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे की काँग्रेस पक्षही लवकच फुटणार आहे. तर संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत जी परिस्थिती आत्ता निर्माण झाली ती भाजपामुळेच झाली आहे. त्यांनी २०१९ ला वचन पाळलं नाही त्याचा हा परिणाम आहे असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे यवतमाळच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी पोहरा देवीची शपथ घेऊन हे सांगितलं आहे की अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद असंच ठरलं होतं. त्याचाही उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. तसंच भाजपा हा बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे असं म्हटलं आहे. पावसाने काही प्रमाणात राज्यातून ब्रेक घेतला आहे. तर इतरही महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडत आहेत. या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

shiv sena ubt chief uddhav thackeray criticized bjp
भ्रष्टाचार हीच भाजपची गॅरंटी! ठाकरे
Jayant Patil On Ajit Pawar
“अजित पवार आणखी पाच-सहा दिवस थांबले असते, तर त्यांची इच्छा…”; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
Rohini khadse and eknath khadse
रोहिणी खडसेही स्वगृही परतणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar
देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना मिश्किल टोला; म्हणाले, “अरे बापरे! साहेबांचं किती उदार अंतकरण”
uddhav thackrey slams bjp over various issue
महाराष्ट्र देशातील असंतोषाचा जनक ; उद्धव ठाकरे यांचा भाजप, मोदींवर हल्लाबोल
udayanraje Bhosale marathi news, sharad pawar ncp three and a half district marathi news
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यांपुरती – उदयनराजे
jayant patil, jayant patil criticize Modi Government, madha lok sabha seat, ncp sharad pawar, lok sabha 2024, election 2024, ed, marathi news, Solapur news, madha news, politics news, election campaign,
ईडी लावा, पक्ष फोडा अन् भाजप वाढवा; मोदी सरकारचा एककलमी कार्यक्रम, जयंत पाटील यांचे टीकास्त्र
Chandrashekhar bawankule, bawankule claims that NCP sharad Pawar Group s all Candidates Will Be Defeated, lok sabha 2024, sharad Pawar Group, sharad Pawar Group going to Be Zero, bjp, satara lok sabha seat, election campaign, marathi news, satara news, sharad pawar, bjp state president Chandrashekhar bawankule,
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
Live Updates

Mumbai Maharashtra Updates : ठाकरे परिवाराला सत्तेची भूक नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी

19:14 (IST) 10 Jul 2023
ठाण्यात छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन; छायाचित्रकारांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन

ठाणे: जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे महापालिका चषक २०२३’ या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सविस्तर वाचा...

18:53 (IST) 10 Jul 2023
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्यास छगन भुजबळ यांनी केलं अभिवादन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आठ दिवसापूर्वी शिंदे फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच दरम्यान पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाडयातील महात्मा जोतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्यास अजित पवार यांचे गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या सह आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

18:42 (IST) 10 Jul 2023
नाशिक: लग्नाचे नाटक करुन युवकाची फसवणूक; संशयित युवती ताब्यात

नाशिक: लग्नाचे नाटक करुन ३१ वर्षाच्या युवकाची चार संशयितांनी फसवणूक केली. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

18:42 (IST) 10 Jul 2023
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य…

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात. पण त्याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधीमंडळाचा आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही.

सविस्तर वाचा

18:27 (IST) 10 Jul 2023
मुंबई: सीएसएमटी- भायखळ्यादरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – भायखळ्यादरम्यान अप जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत सोमवारी दुपारी ४.३० वाजता बिघाड झाला. त्यामुळे साएसएमटी – भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

वाचा सविस्तर...

18:14 (IST) 10 Jul 2023
भांडारकर स्मृती पुरस्कार डॉ. विवेक देबरॉय यांना जाहीर

पुणे: पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ आणि इतिहास संशोधक डॉ. विवेक देबरॉय यांना भांडारकर प्राच्यविद्या संशाेधन संस्थेच्या वतीने यंदाचा सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर स्मृती  पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

18:10 (IST) 10 Jul 2023
रवी राणांच्‍या कार्यकर्त्‍यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात; साडी-चोळीचा आहेर देण्‍याचा प्रयत्‍न

माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या अमरावती दौऱ्या दरम्‍यान आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या काही कार्यकर्त्‍यांना ताब्‍यात घेतले. राणा दाम्‍पत्‍याने गर्ल्‍स हायस्‍कूल चौकात हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले होते, पण पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र, कार्यकर्त्‍यांनी नजीकच्‍या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण केले.

सविस्तर वाचा

18:01 (IST) 10 Jul 2023
रेल्वे पुल दुर्घटना घडल्यास ठाणे पालिका जबाबदार; खासदार राजन विचारे यांचा पालिकेला इशारा

रेल्वे स्थानकातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पुलांच्या कामांसाठी मंजुर असलेला निधी गेल्या दोन वर्षांपासून पालिकेने रेल्वे विभागाला दिला नाही. यामुळे पुलाचे काम रखडल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत असून याच मुद्द्यावरून खासदार राजन विचारे यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा

18:00 (IST) 10 Jul 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; एक ऑगस्टला मोदी-पवार पुण्यामध्ये एकाच मंचावर

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.

वाचा सविस्तर...

17:35 (IST) 10 Jul 2023
उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी केली पालिकेची पोलखोल; काँक्रिटच्या वेढ्यातील वृक्षांचा अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे पालिकेला आदेश

शहरातील बहुतांश वृक्ष काँक्रीटमुक्त आहेत तर, उर्वरित काँक्रीटच्या फासात अडकलेल्या वृक्षांचे परिक्षण करण्यात येत असल्याचा दावा उच्च न्यायालयात करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी पोलखोल केली आहे.

सविस्तर वाचा

16:37 (IST) 10 Jul 2023
ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजवा; महापालिका आयुक्तांच्या इतर प्राधिकरणांना सुचना

ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यां‌वरून पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली असून त्याची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीने बैठक घेतली. ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजविण्याचे नियोजन करा, अशा सुचना त्यांनी प्राधिकरणांना दिल्या आहेत.

सविस्तर वाचा

16:22 (IST) 10 Jul 2023
पावसामुळे धुळ्यात ‘शासन आपल्या दारी’ची तारांबळ; मुख्यमंत्र्यांचे आगमन लांबले

पावसाळी वातावरण आणि येथील धावपट्टीवर पाणी साचल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान धुळ्याऐवजी जळगाव येथील विमानतळावर उतरवून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाहनातून धुळ्याकडे निघणे भाग पडले.

सविस्तर वाचा

16:19 (IST) 10 Jul 2023
वाशीम : उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य ; खासदार गवळी विरोधात कोण ?

वाशीम : उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकात नवं चैतन्य संचारले असून आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांच्या विरोधात कुणाच्या नावावर शिक्का मोर्तब होणार हे मात्र, अजूनही कोडेच आहे.

वाचा सविस्तर...

16:01 (IST) 10 Jul 2023
उपराजधानीत ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावावर देहव्यापार; दलालांच्या टोळ्या सक्रिय, सांकेतिक भाषेचा वापर

नागपूर: शहरात ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावावर ‘ऑनलाईन सेक्स रॅकेट’ चालवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अनेक संकेतस्थळांवर तरुणींचे छायाचित्र ‘अपलोड’ करून खुलेआम देहव्यापार सुरू आहे.

सविस्तर वाचा...

16:01 (IST) 10 Jul 2023
भंडारा : गोसीखुर्दचे २५ दारे उघडली; पर्यटकांची गर्दी वाढली...

भंडारा : सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आणि मध्य प्रदेशातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून पातळी नियंत्रित करण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे २५ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहेत. यातून २८३८ क्यूमॅक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक धरण परिसरात गर्दी करीत आहेत. प्रशासनाने धरणावरील भागात असलेल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

15:56 (IST) 10 Jul 2023
फाटाफुटीच्या राजकारणात अकोल्यात राष्ट्रवादीची वाट बिकट

अकोला : महाराष्ट्रातील सत्ताकारणात सातत्याने राजकीय भूकंपाचे धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फाटाफूट झाली. त्याचे परिणाम जिल्ह्यात उमटले. जिल्हा राष्ट्रवादीत शहर व ग्रामीण असे दोन गट पडले आहेत. दोन गटांतील विभागणीमुळे पक्ष अधिक कमकुवत झाल्याचे चित्र असून निवडणुकांच्या तोंडावर अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाट अधिक बिकट झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:46 (IST) 10 Jul 2023
नागपुरात सुसाट स्कूलबस, व्हॅन, ऑटोंमुळे शालेय मुलांचे जीव धोक्यात; वाहतूक पोलिसांची कारवाई नाममात्र

नागपूर : सध्या शाळा सुरू झाल्या असून जवळपास ६५ टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी स्कूलबस, स्कूलव्हॅन किंवा ऑटोने शाळेत जातात. सुसाट धावणाऱ्या या वाहनांमुळे मुलांचे जीव धोक्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

15:46 (IST) 10 Jul 2023
पिसवली, टिटवाळ्यात बेकायदा चाळी जमीनदोस्त

कल्याण: मुसळधार पावसामुळे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, असा गैरसमज करुन पिसवली भागात सरकारी जमिनीवर बेकायदा चाळी उभारणाऱ्या भूमाफियांची नव्याने उभी राहत असलेली बांधकामे आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी जमीनदोस्त केली.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 10 Jul 2023
नागपुरात नियमबाह्य ‘स्कुलबस’ची नाकाबंदी; किती बसवर झाली कारवाई? जाणून घ्या…

नागपूर : जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यावरही ७६२ स्कूलबस, स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी झाली नसल्याचे जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पुढे आले होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारपासून या नियमबाह्य वाहनांवर कारवाई सुरू झाली. पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत १८ वाहने जप्त केली गेली.

सविस्तर वाचा..

15:30 (IST) 10 Jul 2023
धुळ्यात आंदोलक आनंद लोंढे ताब्यात

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन करणारे आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. जनतेच्या प्रश्नासाठी होणाऱ्या आंदोलनाची धास्ती घेत मध्यरात्रीपासूनच पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या दडपशाहीला शरण जात आपणास ताब्यात घेतल्याचा आरोप लोंढे यांनी केला.

सविस्तर वाचा

15:29 (IST) 10 Jul 2023
धुळ्यात काँग्रेसचे केंद्र, राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन

प्रचंड महागाई वाढविणाऱ्या भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करुन सोमवारी धुळे जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 10 Jul 2023
डोंबिवली, कल्याणमधील खड्ड्यांनी प्रवासी हैराण

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डयांमध्ये माती, खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये चिखल होऊन वाहनांचा वर्दळीमुळे खडी रस्त्यावर येत आहे.

सविस्तर वाचा

15:21 (IST) 10 Jul 2023
कल्याण : शिळफाटा रस्त्यावर गोळवलीजवळ लोखंडी सळ्यांचा वाहनांना धोका

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर गोळवली गावाजवळील प्रवेशव्दारासमोर मुख्य वर्दळीच्या काँक्रीटच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामधील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. या सळ्या वाहनांच्या टायरला अडकून मोठा अपघात होण्याची भीती या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा

15:19 (IST) 10 Jul 2023
प्राध्यापक रजांबाबत शिक्षण संस्थांमध्ये संभ्रम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केली परिपत्रक काढण्याची मागणी

सध्या प्राध्यापकांच्या किरकोळ रजा जुन्या कायद्याप्रमाणे १५ ठेवाव्या की नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आठ ठेवाव्यात, यावरून महाविद्यालयीन स्तरांवर गोंधळाचे वातावरण आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीला वर्षभराची मुदतवाढ दिली गेली आहे.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 10 Jul 2023
ठाणे: रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे पाऊण तासात मिळाली प्रवाशाला लॅपटॉपची बॅग

ठाणे: रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे केवळ पाऊण तासात लोकलमध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग प्रवाशाला मिळाली आहे.

सविस्तर वाचा...

14:42 (IST) 10 Jul 2023
“त्रिशुळाचा अपमान करू नका, कुठे बोचतील…”, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका; म्हणाले…

अमरावती : “भगवान शंकराच्या त्रिशुळाचा अपमान करू नका. त्याची तीन टोके कुठे बोचतील, हे तुम्हाला कळणारही नाही. याच त्रिशुळाने महिषासुराचा वध करण्यात आला होता. तुम्हाला आता तीन तोंडे झाली आहेत. दहा तोंडे होतील, तेव्हा त्या रावणाचा वध करण्यासाठी आमचा एकच रामबाण पुरेसा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 10 Jul 2023
विदर्भात ‘येलो अलर्ट’, विजेंच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर: कोकणसह आता विदर्भालाही पावसाचा “येल्लो अलर्ट” देण्यात आला आहे. यादरम्यान, मुसळधार पावसासह काही भागांत विजांचा कडकडाट होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सविस्तर वाचा...

13:28 (IST) 10 Jul 2023
जगातला सर्वात मोठा पक्ष फोडाफोडी का करतो आहे? - उद्धव ठाकरे

“माझ्यावर टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कुणाची घरं फोडली नाहीत. घरफोडे तुम्ही (भाजपा) आहात. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जातं आहे कारण कुणी दारातच उभं करत नाही. कुठे पोलिसांना बसवलं जातं आहे, कुठे शिक्षकांना कामं सोडून बसवलं जातं आहे.” असं म्हणत शासन तुमच्या दारी या मोहिमेवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षावर फोडाफोडीची वेळ का आली आहे? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

13:19 (IST) 10 Jul 2023
कल्याण: नालंदा विद्यालयातील शिक्षिकेने केली बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक

कल्याण: येथील पूर्व भागातील जागृती मंडळ संचलित शासन अनुदानित नालंदा प्राथमिक विद्यालयातील एक शिक्षिका शोभा खैरनार यांनी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.) आणि इतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन शाळेत २८ वर्षापूर्वी नोकरी मिळवली.

सविस्तर वाचा...

13:10 (IST) 10 Jul 2023
मुंबई : महिला प्रवाशावर बलात्कार करणारा रिक्षाचालक अटकेत

मुंबई : २० वर्षीय महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आरे पोलिसांनी २४ वर्षीय रिक्षाचालकाला रविवारी अटक केली. हा प्रकार मे महिन्यात घडला होता, परंतु महिलेने नुकतीच तक्रार दाखल करताच पोलिसांनी रिक्षाचालकाला रविवारी उत्तर प्रदेशामधून अटक केली.

सविस्तर वाचा...

12:44 (IST) 10 Jul 2023
“मी पंतप्रधान झालो तर काय फरक पडणार?”, उद्धव ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, “आणीबाणीपेक्षाही …”

अमरावती : मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, मी पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे. माझ्यासमोर प्रश्न आहे, तो देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचा. देशात आणीबाणीनंतर विरोधी पक्षांना बोलण्याची संधी तरी दिली गेली होती. जनता पक्ष आणि अनेक समविचारी नेते मैदानात उतरले होते, आता तीदेखील मुभा राहिलेली नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

सविस्तर वाचा..

12:08 (IST) 10 Jul 2023
आयरेतील २४ बेकायदा इमारतींना नियमबाह्य वीज पुरवठा; म्हात्रेनगर, रामनगरमधील वीजपुरवठा दररोज खंडित

डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील रामनगर, राजाजी रस्ता, म्हात्रे नगर, टंडन रस्ता मागील काही महिन्यांपासून दररोज एक ते दोन तास वीज पुरवठा खंडित होतो.

सविस्तर वाचा...

12:07 (IST) 10 Jul 2023
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची आज (सोमवार) शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्याची आणि ऑनलाइन पद्धतीने अनामत रक्कम भरण्याची मुदत सोमवारी रात्री ११.५९ वाजता संपणार आहे. त्यामुळे सोडतीत सहभागी होऊन हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्यांनी तातडीने अर्ज भरण्याची गरज आहे.

वाचा सविस्तर...

11:32 (IST) 10 Jul 2023
पुणे महापालिकेत भरती, ‘ही’ पदे भरली जाणार

पुणे: महापालिका प्रशासनाने ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दीवाढीमुळे महापालिका प्रशासनावर ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून कनिष्ठ अभियंत्यांबरोबरच सात उपकामगार अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या प्रत्येकी एका जागेसाठी येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर...

11:31 (IST) 10 Jul 2023
कल्याणमधील आ. गणपत गायकवाड यांची समाज माध्यमातून बदनामी करणारा अटकेत

कल्याण: मागील काही दिवसांपासून कल्याण पूर्व विधानसभेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची समाज माध्यमांत बदनामी करणाऱ्या कल्याण पूर्व भागातील जरीमरी भागातील एका तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी रविवारी अटक केली. या बदनामी प्रकरणावरुन आ. गायकवाड यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती.

वाचा सविस्तर...

11:30 (IST) 10 Jul 2023
“अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री, अन् छगन भुजबळ…”, खातेवाटपावरून संजय राऊतांचे टीकास्र

राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर वृत्त वाचा

11:28 (IST) 10 Jul 2023
“अजित पवारांना व्हिलन केलं जातंय, दादा मोठे नेते…”; रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “भाजपा एसीमध्ये बसून…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंडखोरी केली असून आता या पक्षातही दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीतील बरेच आमदार अजित पवारांसह गेले असून शरद पवार गटाकडे किती संख्याबळ आहे हे अद्यापही जाहीर झालेले नाही. दरम्यान, बंडखोरी मागे नेमका कोणाचा हात होता यावरही खुलासा होऊ शकलेला नाही. छगन भुजबळ आणि अजित पवारांकडे या बंडखोरीचा रोख असला तरीही छगन भुजबळांनी हात वर केले आहेत. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतही छगन भुजबळांनी याबाबत वक्तव्य केलं होतं. यावरून शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.

सविस्तर वृत्त वाचा

11:25 (IST) 10 Jul 2023
अमरावती: गूढ उलगडले! अल्पवयीन युवतीची प्रेमप्रकरणातून हत्‍या

अमरावती: यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव नजीकच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या अल्पवयीन युवतीच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून तिच्या मित्रानेच हत्या केल्याचे व नंतर आरोपीने तिच्‍या आत्महत्येचा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

सविस्तर वाचा...

11:10 (IST) 10 Jul 2023
प्रयोगशील शेतकरी व कृषी पदवीधर ठरताहेत प्रेरणादायी! कृषी विद्यापीठाचा ‘आयडॉल’ उपक्रम

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यशस्वी व प्रगतशील शेतकरी व कृषी पदवीधरांचे कार्य इतर शेतकऱ्यांपुढे मांडण्यासाठी ‘कृषी पदवीधर आयडॉल’ उपक्रम सुरू केला.

सविस्तर वाचा...

11:10 (IST) 10 Jul 2023
वारली चित्रकलेचा अद्भुत शालेय आविष्कार, पंतप्रधानांच्या हस्ते होणार प्रकाशन

वर्धा: वारली चित्रकलेच्या शालेय आविष्काराची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली असून या संग्रहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

सविस्तर वाचा...

11:10 (IST) 10 Jul 2023
नागपूर : भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; भीषण अपघातात एक ठार, ८ जखमी

नागपूर : भरधाव कार ट्रकला धडकून झालेल्या अपघातात एकजण ठार तर कुटुंबातील आठजण जखमी झाल्याची घटना रामटेक ते भंडारा रोड अरोली खंडाळा गावाजवळ घडली.

सविस्तर वाचा...

11:09 (IST) 10 Jul 2023
नागपूर : कोराडी वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलर ट्यूब लिकेजमुळे २१५ दशलक्ष वीज युनिट्सचे नुकसान!

नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी वीजनिर्मिती केंद्रातील ६६० मेगावॅटच्या नवीन संचामध्ये वारंवार बाॅयलर ट्यूब लिकेज (बीटीएल) होत आहे. निकृष्ट कोळशामुळे असा प्रकार घडत असल्याची तक्रार आहे. हे संच बंद पडल्याने राज्याचे २१५ दशलक्ष वीज युनिटचे नुकसान झाले आहे. या विषयावर महानिर्मितीचे अधिकारी उत्तर देत नसल्याने तक्रारीबाबत शंका वाढत आहे.

सविस्तर वाचा...

11:08 (IST) 10 Jul 2023
धक्कादायक! वडिलांचा अबोला सहन न झाल्याने मुलाने संपविले जीवन

नागपूर : वडिलांचे मन दुखावल्याचे मुलाला अतीव दु:ख, आता वडील आपल्याशी कधीच बोलणार नाहीत, अशी मनात सल, वडिलांचा दुरावा यामुळे मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवले. वेद रितेश खेळवदकर (१४, रा. लालगंज, झाडे चौक) असे मृत मुलाचे नाव आहे.

सविस्तर वाचा..

11:06 (IST) 10 Jul 2023
अमरावती : सौदी अरेबियात नोकरीचे आमिष; बेरोजगारांची ४ लाखांची फसवणूक

अमरावती : सौदी अरेबियामध्ये नोकरी लावून देण्याची बतावणी करून आणि व्हिसा, पासपोर्ट बनवून देण्याचे आमिष दाखवून काही बेरोजगारांची तब्बल ४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यांचे पासपोर्टसुद्धा ठेवून घेण्यात आले.

सविस्तर वाचा..

11:06 (IST) 10 Jul 2023
चंद्रपूर : शेतमजुराची मुलगी बनली फौजदार, तनुजा खोब्रागडे हिचे एमपीएससी परिक्षेत सुयश

चंद्रपूर : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण बालपणापासून मुलीला देणाऱ्या चिमूर तालुक्यातील गिरोला गावातील गोकुलदास आणि कांता खोब्रागडे या गरीब शेतमजुराची मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक झाली.

सविस्तर वाचा...

11:05 (IST) 10 Jul 2023
दोघांनीही आपले ‘उप’ पद वाचविले !

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणाचे सारे संदर्भ बदलले असताना विधिमंडळातील दोन्ही ‘उप’ पदे वाचविण्यात उभयतांना यश आले आहे. अजित पवार यांच्या बंडाला साथ दिल्यानेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पद वाचणार आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्याही पदावर आता गंडांतर येणार नाही.

सविस्तर वाचा..

10:53 (IST) 10 Jul 2023
उद्धव ठाकरे हे खोटं बोलणारे नेते नाहीत-संजय राऊत

ठाकरे परिवाराला सत्तेची भूक नाही. ठाकरे परिवार आजपर्यंत राज्याला विचार देत आला आहे असं वक्तव्य आता संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची शपथ घेऊन हे सांगितलं आहे की भाजपा आणि शिवसेनेचं अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची वाटणी झाली होती. उद्धव ठाकरे हे खोटं बोललेलं नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

What Uddhav Thackeray Said?

उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार.

महाराष्ट्रातल्या राजकारणात २ जुलैपासून उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड करुन शरद पवारांविरोधातच दंड थोपटले आहेत. तर शरद पवार यांनी कुणावरही टीका करणार नाही, नव्या जोमाने पक्ष बांधणी करणार असं म्हणत पुन्हा एकदा मैदानात उतरुन तयारी सुरु आहे. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे की काँग्रेस पक्षही लवकच फुटणार आहे.