Mumbai- Pune Rain Updates : नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी जाहीर केले आहे. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरात पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान येत्या काही तासांत मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

Live Updates

Mumbai Rain Update : राज्यातील पावसासंबंधीत आणि इतरही सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:07 (IST) 15 Sep 2025

शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून महत्वाचा आदेश, युजीसीने ८ आठवड्यात…

उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेत, सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला विविध हितधारकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून नियमावली अधिसूचित करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ८ आठवड्यांची मुदत दिली. ...वाचा सविस्तर
19:55 (IST) 15 Sep 2025

कृषिविषयक प्रश्नांवरुन नेत्यांची सरकारवर झोड - कर्जमाफीसाठी महिनाभराची मुदत

शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ईदगाह मैदानापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. ...अधिक वाचा
19:42 (IST) 15 Sep 2025

गळ्यात कांद्यांच्या माळा, टोपल्यांमध्ये शेतमाल; आक्रोश मोर्चाला तुतारीसह आदिवासी वाद्यांची साथ

शहरातील ईदगाह मैदानापासून मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे या बैलगाडीवर चढल्या. ...सविस्तर बातमी
19:32 (IST) 15 Sep 2025

Video : …अन् शेतकऱ्याने हंबरडा फोडला, पावसाने केली दैना; आमदार म्हणतात…

पावसाचे पाणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारे पाणी, दोन्ही थांबता थांबत नाही. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त गावात भेटी देणे सूरू केले आहे. ...सविस्तर वाचा
19:23 (IST) 15 Sep 2025

पूजा खेडकर यांचे वडील अडचणीत…. रबाळे येथील अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल

शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री मिक्सर वाहन चालक तरुण आणि दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूझर गाडीचा किरकोळ अपघात झाला. त्यावरून झालेल्या अपघातात गाडी घासली घेल्याने खेडकर यांनी नुकसानभरपाईची मागणी केली असता, चालकाने पैसे देण्यास नकार दिला. ...सविस्तर वाचा
19:13 (IST) 15 Sep 2025

जळगाव : रावेर तालुक्यात चोरलेला १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; १० संशयित पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणातील मुख्य संशयित विलास ऊर्फ काल्या सुपडू वाघोदे हा अद्याप फरार असला, तरी पोलिसांनी त्याचे साथीदार आणि चोरीचा माल बाळगणारे तसेच विक्री करणारे असे तब्बल १० संशयित ताब्यात घेतले आहेत. ...वाचा सविस्तर
19:11 (IST) 15 Sep 2025

संजय राऊत यांचा आरोप आणि भाजपचा फरार माजी नगरसेवक शरण…

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त मोर्चात खा. संजय राऊत यांनी धोत्रे या युवकाची हत्या सत्ताधारी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यानी केल्याचा आरोप केला होता. ...अधिक वाचा
19:07 (IST) 15 Sep 2025

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निपुण करण्याचे शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान; दर्जा उन्नतीसाठी प्रयत्नांचा टप्पा पूर्ण

निपुण पालघर अभियान उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा १५ ऑक्टोबर रोजी पूर्ण होत असून याकरिता शिक्षण विभाग (प्राथमिक) व शिक्षकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ...अधिक वाचा
18:54 (IST) 15 Sep 2025

Video: पाताळगंगेला पूर; शेतीला लहान तळ्यांचे स्वरुप; सोयाबीन, कपाशी पाण्याखाली…

पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पात्राचे पाणी नदी लगताच्या शेकडो हेक्टर शेतीमध्ये शिरले आहे. यामुळे शेतांना छोट्या तलावांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...सविस्तर बातमी
18:36 (IST) 15 Sep 2025

सुगरणीच्या आयत्या खोप्यात मुनियांचा घरोबा; मुक्त विद्यापीठ परिसरातील निरीक्षण

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यश सेंटर फॉर बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन समितीतर्फे सुरु असलेल्या पक्षी सर्वेक्षणात ही दुर्मीळ घटना बघावयास मिळाल्याचे प्रा. बोरा यांनी नमूद केले आहे. ...वाचा सविस्तर
18:15 (IST) 15 Sep 2025

Nashik Kumbh Mela: नाशिकरोड रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी व्यवस्था; गर्दी व्यवस्थापन कामांना मंजुरी

फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय झाला होता. ...वाचा सविस्तर
18:00 (IST) 15 Sep 2025

कल्याणमध्ये तोतया पोलिसाने ७० वर्षाच्या वृध्दाला लुटले

तक्रारदार प्रमोद भास्कर जोशी (७०) हे आधारवाडी भागातील अन्नपूर्णानगर मधील कालभैरव मंदिराजवळील सर्वोदय ओनिक्स सोसायटीत आपल्या कुटुंबीयांंसह राहतात. ...वाचा सविस्तर
17:55 (IST) 15 Sep 2025

Aaple Sarkar Portal : ‘आपले सरकार पोर्टल’वरील २ हजार ६६५ तक्रारी निकाली

शासन निर्देशानुसार २१ दिवसांच्या आतमध्ये आपले सरकार केंद्रावर दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे अनिवार्य आहे. ...वाचा सविस्तर
17:54 (IST) 15 Sep 2025

अंबरनाथ, बदलापुरात ‘प्रदुषण पर्व’; यंत्रणांचा कानाडोळा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

विशेषतः पावसाळ्यात रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिसळून प्रदूषण केले जात आहे. ...अधिक वाचा
17:52 (IST) 15 Sep 2025

नवरात्रोत्सवापूर्वी खड्डे न भरल्यास कल्याणमधील शिवसेनेचा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडण्याचा इशारा

गेल्या वीस दिवसाच्या कालावधीत रस्त्यावरील भरणी केलेल्या खड्ड्यातील सीमेंट, खडी मुसळधार पावसात वाहून गेली आहे. आता जैसे थे खड्डे झाले आहेत. ...अधिक वाचा
17:43 (IST) 15 Sep 2025

जळगाव : हाणामारीत मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी महामार्गावर रास्तारोको

एकनाथ गोपाळ (५५) असे हाणामारीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बिलवाडी येथील गोपाळ आणि पाटील परिवारांमध्ये काही वर्षांपासून वाद आहेत. ...सविस्तर वाचा
17:39 (IST) 15 Sep 2025

ठाण्यातील वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर मनसे आक्रमक, डीसीपींंना विचारला जाब

ठाणे शहरात खराब रस्ते आणि त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. घोडबंदरमध्ये दररोज वाहतुक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो. ...वाचा सविस्तर
17:29 (IST) 15 Sep 2025

Video: 'केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा' -आमदार सुधीर मुनगंटीवार भजन गात तल्लीन; समाजमाध्यमात चर्चा…

भजन हे केवळ भक्तिगीत नसून ते समाजात श्रद्धा, एकात्मता व अध्यात्म जागविणारे, समाजाच्या एकतेचे प्रेरणादायी माध्यम आहे, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...सविस्तर वाचा
17:17 (IST) 15 Sep 2025

आदिवासींचा शहापूर ते मंत्रालय पर्यंत पायी मोर्चा, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामावेश करण्यास विरोध

आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शहापूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. ...सविस्तर बातमी
17:15 (IST) 15 Sep 2025

Video: हात लावताच रस्ता गायब! अभियंता दिनाच्या दिवशीच अभियंत्यांचे पितळ उघडे…

साडेचार किमीचा हा रस्ता सव्वादोन कोटी खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. ...सविस्तर वाचा
16:54 (IST) 15 Sep 2025

मुंबईनंतर दुसरी चित्रनगरी रामटेक परिसरात, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार म्हणाले, १५ दिवसातच….

रामटेक शेजारील नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी शेलार यांनी सोमवारी केली व त्यानंतर रामटेक येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...वाचा सविस्तर
16:51 (IST) 15 Sep 2025

सोन्याचे दागिने महाग, फसवणूक करणाऱ्यांच्या टोळ्या सक्रीय, सोने दाखविल्यास बक्षिसांचे अमीष दाखवून फसवणूक

ठाणे जिल्ह्यात सोन्याचे दागिने दाखविल्यास त्याबदल्यात रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीनचे बक्षीस मिळेल असे सांगून भिवंडीतील काही महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
16:39 (IST) 15 Sep 2025
डोंबिवली पलाव्यात झोमॅटो-स्विगी डिलिव्हरी बॉय रस्त्यावर; मनसेचा कंपनीला इशारा

- अपघात इन्शुरन्स, पेट्रोल खर्च आणि कमी मानधनावर चुकीच्या लोकेशनमुळे होणारा त्रास, कंपनीकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याने डिलिव्हरी बॉय आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाला मनसेने जाहीर पाठिंबा दिला असून आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. झोमॅटो-स्विगी कंपन्यांनी डिलिव्हरी बॉयला कामावरून काढले किंवा गुन्हे दाखल केले किंवा धमक्या दिल्या, तर कल्याण, डोंबिवली, पलावा, दिवा परिसरातील हॉटेलमधून एकही ऑर्डर बाहेर निघू देणार नाही, असा इशारा मनसेने यावेळी दिला.

16:27 (IST) 15 Sep 2025

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम, कसा बनतो हा चिवडा…

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी तब्बल तीनवेळा झुंज दिल्यानंतरही हार न मानणाऱ्या नीता अंजनकर यांनी पुन्हा एकदा विक्रम केला आहे. ...अधिक वाचा
16:19 (IST) 15 Sep 2025

नवी मुंबई : दोन दिवसांत घरफोडीचे ३ गुन्हे, ३१ लाखांचा ऐवज चोरी; मंदिरातील ३ लाख रुपयांच्या समईचाही समावेश

नवी मुंबईत घरफोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात तीन घरफोडीचे गुन्हे नोंद झाले आहेत. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. ...सविस्तर बातमी
16:15 (IST) 15 Sep 2025

मुसळधार पावसानंतर पुन्हा वाहन कोंडी, भुयारी मार्गाखाली पाणी साचले

सोमवारी सकाळपासूनच नागपुरात आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे पावसाचा अंदाज होताच. दुपारी दोनचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. ...सविस्तर बातमी
16:06 (IST) 15 Sep 2025

देवरी : सिमेंट विट कारखान्यात मजुराचा मृत्यू

रविवारी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रंजीत सदाराम सोनटक्के (वय ३८, रा. पिंडकेपार/गोटाबोडी. ता.देवरी) असे मृत मजुराचे नाव आहे. ...सविस्तर बातमी
15:47 (IST) 15 Sep 2025

मृतदेह बाजूला ठेऊन दोन गटांत तुंबळ हाणामारी, स्मशानभूमीच्या जागेवरून…

नागेपल्ली येथील स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरून आलेल्या काही लोकांनी बेकायदेशीरपणे वराहपालन सुरू केले होते. ...वाचा सविस्तर
15:40 (IST) 15 Sep 2025

नितीन गडकरी यांना जे शक्य, ते महाराष्ट्रात अशक्य; खराब रस्त्यावरून सुप्रिया सुळे संतप्त

खड्डेमय नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यांवरून प्रवास केल्याने सुप्रिया सुळे संतप्त; निधी असूनही कामाचा दर्जा नाही, असा सरकारला सवाल. ...सविस्तर वाचा
15:35 (IST) 15 Sep 2025

डोंबिवलीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कमानी, १५० बेकायदा फलकांवर कारवाई

नियमबाह्य फलक, बेकायदा कमानी उभारण्यात आल्या तर त्या काढून टाकण्या येणार आहेत, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले. ...सविस्तर वाचा