महाराष्ट्रात ११ हजार ४१६ नवे करोना रुग्णा पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ३०८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण मृतांची संख्या ४० हजार ४० इतकी झाली आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही १५ लाख १७ हजार ४३४ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासात २६ हजार ४४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ८२. ७६ टक्के झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २२ लाख ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज राज्यात ११ हजार ४१६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १५ लाख १७ हजार ४३४ इतकी झाली आहे. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख २१ हजार १५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील चोवीस तासंमध्ये ज्या ३०८ मृत्यूंची नोंद झाली, त्यापैकी १६८ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. ६० मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत तर उर्वरित ८० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचे आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 11416 new covid19 cases 308 deaths and 26440 discharges today scj
First published on: 10-10-2020 at 20:21 IST