महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजार ५३५ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १७ लाख ६३ हजार ५५ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. ज्यापैकी १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आज घडीला ७९ हजार ७३८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर महाराष्ट्रात आजपर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ९९ लाख ६५ हजार ११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६३ हजार ५५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज समोर आलेल्या संख्येनुसार राज्यात ५ लाख ६० हजार ८६८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार २८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार ८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.७९ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत ९२४ नवे रुग्ण
मुंबईत करोनाचे ९२४ नवे रुग्ण मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. तर १ हजार १९२ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत २ लाख ७२ हजार ४४९ रुग्णांना करोनाची बाधा झाली. त्यापैकी २ लाख ४९ हजार ९०३ रुग्णांनी करोनावर मात केली. तर आत्तापर्यंत एकूण १० हजार ६२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत ८ हजार ४७४ रुग्ण उपचार घेत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 5535 new covid19 cases 5860 recoveries and 154 deaths scj
First published on: 19-11-2020 at 20:55 IST