Maharashtra Board Class 10 Result 2025 Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर यंदाच्या वर्षी राज्यात २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. तर २८१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
राज्यात ३५ टक्के मिळवणाऱ्या २८५ विद्यार्थ्यांबाबत माहिती
नागपूर – ६३ विद्यार्थी, छत्रपती संभाजी नगर – २८ विद्यार्थी, मुंबई – ६७ विद्यार्थी, कोल्हापूर – १३ विद्यार्थी, अमरावती – २८ विद्यार्थी, नाशिक – ९ विद्यार्थी, लातूर – १८ विद्यार्थी, कोकण – ० विद्यार्थी, एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत.
२११ जणांना १०० टक्के
दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी २११ आहेत. त्यात शंभर टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूर बोर्डाचे आहेत. लातूरच्या ११३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाले आहे. पुण्यातील १३ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहे. नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, कोकण ९ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
विभागनिहाय SSC निकाल… (सर्वाधिक ते सर्वात कमी क्रमाने)
कोकण विभाग – ९८.८२ टक्के
कोल्हापूर विभाग – ९७.४५ टक्के
मुंबई विभाग – ९५.८४ टक्के
पुणे विभाग – ९४.८१ टक्के
नाशिक विभाग – ९३.०४ टक्के
अमरावती विभाग – ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ९२.८२ टक्के
लातूर विभाग – ९२.७७ टक्के
नागपूर – ९०.७८ टक्के
प्रथम-द्वितीय-उत्तीर्ण श्रेणीची टक्केवारी
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
१ लाख ८ हजार ७८१ विद्यार्थी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
मुलीच ठरल्या सरस, कोकणाची पुन्हा बाजी!
सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.