कवठे महांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील सुभाष झांबरे खूनप्रकरणातील मुख्य साक्षीदाराने आत्महत्या केल्याचे रविवारी उघडकीस आले. सुभाष झांबरे याचा तीन वर्षांपूर्वी राजकीय कारणातून खून झाला असल्याने या प्रकरणाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे मुख्य साक्षीदार विकास ऊर्फ गोटय़ा शिंदे याच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ माजली आहे.
सुभाष झांबरे या घाटनांद्रे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा तीन वर्षांपूर्वी गावी जात असताना जाखापूर-कुंडलापूर या मार्गावर खून झाला होता. सध्या या प्रकरणी आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू असून सर्व साक्षीदारांचे जबाब न्यायालयाने नोंदवले आहेत. हा खटला अंतिम स्तरावर असतानाच मुख्य साक्षीदार विकास ऊर्फ गोटय़ा शिंदे याने आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले.
विकास शिंदे हा २२ वर्षांचा तरुण कालपासून घरातून गायब झाला होता. आज मळय़ात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने विषारी औषध घेतल्याने मृत्यू झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरी उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2014 रोजी प्रकाशित
झांबरे खूनप्रकरणातील मुख्य साक्षीदाराची आत्महत्या
कवठे महांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील सुभाष झांबरे खूनप्रकरणातील मुख्य साक्षीदाराने आत्महत्या केल्याचे रविवारी उघडकीस आले. सुभाष झांबरे याचा तीन वर्षांपूर्वी राजकीय कारणातून खून झाला असल्याने या प्रकरणाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
First published on: 27-10-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main witness committed suicide in jhambare murder case