किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत आणि शेवटी गंभीर दुखापत करण्यापर्यंत गेल्याची अनेक प्रकरणं आपण पाहात असतो. असाच एक धक्कादायक प्रकार सांगलीत घडला असून त्यामध्ये मारहाण झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून तरुणाला मारहाण करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार घडला सांगलीच्या शिरोळ तालुक्यातल्या आलास भागात. या भागातल्या एका हॉटेलमध्ये १७ मे रोजी अनिस महंमद पटेल आणि ओंकार माने हे जेवायला गेले होते. त्यावेळी चुकून धक्का लागल्यामुळे ताटात रस्सा सांडल्याचं कारण पुढे करत ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार आणि कुलदीप संकपाळ यांनी ओंकारशी वाद घालायला सुरुवात केली.

हळूहळू हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. अनिस महंमद पटेल आणि ओंकार माने या दोघांना इतर तिघांनी मिळून मारहाण केली. त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यात ओंकारवर शस्त्रहल्ला करण्यात आला होता. त्यामुळे त्याला झालेल्या दुखापतीवर रुग्णालयात तातडीने उपचार देखील सुरू करण्यात आले. मात्र, आज सकाळी ओंकारचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिघे मारेकरी अटकेत

या प्रकरणी तपास करत पोलिसांनी तिघा मारेकऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आलास गाव आणि मारेकऱ्यांच्या घराजवळ बंदोबस्त वाढवला आहे.