सोलापूर : एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दशरथ विठ्ठल शिंदे (रा. सोलापूर) यास सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयानै दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अकरा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. २०१३ साली घडलेल्म या खटल्यातील पीडित मुलगी स्वतःच्या घरात वडील आणि बहिणीबरोबर एकत्र राहात होती. तिची आई पुण्यात राहून मोलमजुरी करीत होती. वडील रखवालदार म्हणून दररोज रात्री कामावर जायचे.

हेही वाचा >>> मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
mentally retarded girl rape marathi news
धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

२०१३ साली आई पुण्यातून सोलापुरात घरी परतली असता पीडित मुलीचे पोट दुखू लागले. तिला रुग्णालयात नेले असता ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. नंतर विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत लैंगिक अत्याचाराचा प्रकार उजेडात आला. आरोपी विठ्ठल शिंदे याने पुण्यातून आईचा फोन आल्याची थाप मारून पीडित मुलीला घराचा  दरवाजा उघडण्यास सांगून बाहेर नेले आणि लैंगिक अत्याचार केल्याची तसेच या कृत्याची वाच्यता न करण्यासाठी धमकावले होते, अशी माहिती पीडित मुलीने उघड केली. त्यानुसार तिच्या आईने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली होती. दरम्यान, पीडित मुलगी प्रसूत होऊन तिने मुलीस जन्म दिला.

हेही वाचा >>> “अमरावतीची जागा भाजपाच लढवणार, नवनीत राणा…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

पोलीस आधिकारी फौजदार महादेव महानवर यांनी पीडित मुलीसह तिच्या नवजात बाळाची आणि आरोपीची डीएनए चाचणी होण्यासाठी मुंबईत शासकीय प्रयोगशाळेत नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल सकारात्मक येऊन पीडित मुलगी आणि आरोपी हेच बाळाची आई-वडील असल्याचे निष्पन्न झाले. परंतु या अहवालावर आरोपी विठ्ठल शिंदे याने अविश्वास दाखवून पुन्हा दुस-या प्रयोगशाळेतून डीएनए चाचणी करण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायलयाने मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष पीडित मुलगी, तिचे नवजात बाळ आणि आरोपीचे नमुने घेऊन पुण्यातील रासयनिक प्रयोगशाळेतून डीएनए चाचणी करून घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार कार्यवाही होऊन पुन्हा डीएनए चाचणी अहवाल सकारात्मक आला. हा पुरावा महत्वाचा ठरला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा व दंड सुनावला. सरकारतर्फे ॲड. एन. बी. गुंडे यांनी काम पाहिले.