राजापूर : कौटुंबिक वादातून सख्या भावानेच आपल्या भावावर सुरीने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना राजापूर तालुक्यातील काजीर्डा राणेवाडी येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी काजीर्डा राणेवाडी येथील बाळकृष्ण आत्माराम राणे (वय ७२) आणि त्यांचा सख्खा भाऊ शांताराम आत्माराम राणे (वय ५६ ) यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू झाले. या दोघांमध्ये सुरु झालेले वाद इतके शिगेला पोहोचले की, बाळकृष्ण राणे यांनी रागाच्या भरात आपल्या सख्ख्या भाऊ शांताराम राणे यांना सुरीने भोसकले. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शांताराम राणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी राजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा-Laxman Hake : “शरद पवार हे महाजातीयवादी नेते”, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांची टीका; म्हणाले, “पवार कुटुंबातील व्यक्ती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणाची फिर्याद रामचंद्र चंद्रकांत अर्डे (वय ३०) याने राजापूर पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीनुसार बाळकृष्ण राणे यांच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १०९ प्रमाणे राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळकृष्ण आत्माराम राणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.