मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे आणि संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. गेल्या ११ दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण पकडलं असून सरकारकडून त्यांच्या मागणीचं अद्यापही समाधान केलं गेलं नाही. आजही सरकारने त्यांना पाठवलेल्या अहवालातून जरांगे पाटलांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

हेही वाचा >> “४० तासांत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांचा…”, संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “घटनेची पायमल्ली..”

“जरांगे पाटील हा फाटका माणूस, एखादी गोष्ट मनाशी धरून जेव्हा फाटकी माणसे आंदोलनात उतरतात तेव्हा त्यांच्या विचारापासून त्यांना दूर करणे कठीण असतं. त्यांना काही मिळवायचं आहे का? तर नाही. व्यक्तिशः त्यांना काही मिळवायचं नसतं. मी त्यादिवशी त्यांना पाहिलं तेव्हा मला वाटलं की हा माणूस शरण जाणाऱ्यातला नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“ते त्यांच्या समाजासाठी लढत आहेत. त्या फाटक्या माणसाच्या मागे पाठीशी संपूर्ण समाज उभा आहे. सरकारच्या वतीने त्यांचं आंदोलन फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेगवेगळ्या समाजातील लोक त्यांच्या विरोधात उभे केली जात आहेत हे चित्र मला दिसतंय. पण हे आंदोलन कितीही तोडण्या-फोडण्याचा प्रयत्न केला तरी हे आंदोलन संपणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “शिक्षक बिघडण्याच्या मार्गावर, मोदीजी शिक्षकांना कामाला लावणार…”; चंद्रकांत पाटील यांचे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

..तर ४० तासांत निकल लागू शकतो

संजय राऊत म्हणाले, “राहुल नार्वेकरांनी निकाल लावायला एक वर्ष घेतलं आहे. ४० आमदारांचा निकाल लावायला ४० तास पुरेसे आहेत. घटनेतून निकाल लावायचं काम करायचं आहे. चिन्हावर निवडून आले आणि फूट पाडून बाहेर गेलेत. १० शेड्युल्डनुसार निर्णय द्यायचा आहे.घटनेतील १० व्या शेड्युलनुसार राहुल नार्वेकरांना निर्णय द्यायचा आहे. त्यांना १० वी घटना माहित नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही तज्ज्ञ पाठवू. ४० तासांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचा निकाल लागू शकतो, पण त्यांना लावायचा नाहीय. हे घटनेची पायमल्ली करत आहेत. फालतू राजकारण करून महाराष्ट्राला अस्थिर करत आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.