हिंगोलीत रविवारी ( २६ नोव्हेंबर ) दुसरा ‘ओबीसी एल्गार मेळावा’ पार पडला. या सभेतून ओबीसी नेते, प्रकाश शेंडगे यांनी “आमच्या नेत्यांचे घरे जाळायला येणाऱ्यांचे हात कलम करू,” असा इशारा दिला होता. याला मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी जातीसाठी पाय तोडून घेण्यास तयार आहे, असं आव्हान जरांगे-पाटलांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

प्रकाश शेंडगे काय म्हणाले?

“आता पिस्तूल आणि काडतुसे सापडली आहेत. असलं आंदोलन असतं का? आम्ही तुमच्यावर खडाही टाकत नाही. जे हात आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची घरे जाळण्यास येतील, ते कलम केले जातील,” असं विधान प्रकाश शेंडगे यांनी केलं होतं.

हेही वाचा : “तुम्ही कुणाची लायकी काढता?” जरांगे-पाटलांवर छगन भुजबळ संतापले; म्हणाले, “शिवरायांच्या स्वराज्यासाठी…”

यावर जरांगे-पाटलांनी म्हटलं, “या वयात पाय आणि हात तोडण्याची भाषा करत आहेत. पाय तोडायला यावे. मी जातीसाठी पाय तोडून घेण्यास तयार आहे.”

हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांचा ओबीसी नेत्यांना इशारा, छगन भुजबळ म्हणाले, “मी त्यांना सांगू इच्छितो की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मराठा आरक्षणाच्या विरोधात विधान केलं की, सुट्टी नाही. जातीयवादी वक्तव्य करत असल्याने चार-पाच नेते यांना ( छगन भुजबळ ) सोडून गेले आहेत. जुने नेते आहात, अनुभवही अधिक आहे. पांढरी केस होऊन उपयोग नाही. जाती-जातींमध्ये दंगली घडवण्याचं काम करत आहात. सरकारही त्यांच्या दबावात येत आहे. सरकारने ओबीसी नेत्यांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नये,” असं आवाहन मनोज जरांगे-पाटलांनी केलं आहे.