राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, मराठा समाज आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचं समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका चालू आहेत. अशीच एक बैठक आज (२९ मार्च) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन गट भिडल्याचं पाहायला मिळालं.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला केला. बराच वेळ दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे
sangli lok sabha seat, nana patole, sanjay raut, congress, shivsena uddhav thackarey, lok sabha 2024, election 2024, maha vikas aghadi, conflict in maha vikas aghadi, maharashtra politics, maharashtra news, marathi news, sangli news, election news,
“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”
praniti shinde question photos of pm narendra modi
खतांच्या बॅगांवर मोदींचा फोटो, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल; प्रणिती शिंदे संतापल्या
CM Eknath Shinde Devendra Fadnavis Raj Thackeray
मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल राहुल शेवाळेंचं मोठं विधान; म्हणाले, “शिंदे, फडणवीस, राज ठाकरे एकत्र…”

हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी एक महिला कार्यकर्ती म्हणाली, “या बैठकीद्वारे सामान्य मराठा लोकांचा आवाज दाबला जातोय. आम्ही मनोज जरांगे पाटलांबरोबर आहोत. इथे या लोकांची बैठक चालू होती. यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बैठक घ्यायला हवी होती. बैठक घेण्यावरून इथे भांडण झालं.” दुसऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की, आम्ही केवळ मराठा समाजासाठी इथे आलो आहोत. आम्हीदेखील अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी लढत आहोत. परंतु, यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावलं नाही. आम्ही मराठा समाजाचे घटक नाही का? काहीजण राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन इथे आले होते. समाजातील कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज मिळाला नाही. हे काही ठराविक जण समाजाचे मालक झालेत का?

हे ही वाचा >> “वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”

दरम्यान, ज्यांच्यावर हल्ला झाला अशा लोकांपैकी एका कार्यकर्त्याने सांगितलं की, मराठा समाजातील काही गरजवंतांनी ही बैठक आयोजित केली होती. मला या बैठकीबाबत एक संदेश मिळाला. त्यामुळे मी इथे आलो. परंतु, काही लोक ही बैठक कोणी आयोजित केली? ही बैठक कोणी बोलावली आहे? असे प्रश्न विचारत आमच्यावर तुटून पडले, काही लोकांची इथे दडपशाही चालू आहे. आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.