Maharashtra Political New Live Updates, 17 November 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे. या दरम्यान नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर-१ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे रविवारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ही कृती नियमबाह्य असल्याचे सांगत नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर नवी मुंबईत राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. तसेच आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमीत्ताने राजकीय वर्तुळात त्यांना मानवंदना दिली जात आहे.

दुसरी महानगर गॅसच्या पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा पुरवठा बाधित झाला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांना सीएनजी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये मोठा बिघाड झाला आहे. यामुळे सीएनजीचा पुरवठा काही ठिकाणी बंद पडला असून काही ठिकाणी तो कमी दाबाने होत आहे. यामुळे सीएनजी पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. यामुळे या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंबंधीच्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : महाराष्ट्रातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी येथे वाचा एका क्लिकवर

13:35 (IST) 17 Nov 2025

बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे बंधू एकत्र; आदित्य ठाकरेंनी पोस्ट केले फोटो

आज हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आई रश्मी ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष- माझे काका राज साहेब ठाकरे ह्यांच्यासह शिवतीर्थावरील स्मृतिस्थळास भेट देऊन विनम्र अभिवादन केले, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

13:33 (IST) 17 Nov 2025

Amit Thackeray FIR Post: भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन! – अमित ठाकरे

रविवारी दुपारी मनसेचे नेते अमित ठाकरे व कार्यकर्त्यांनी मिळून महापालिकेची अधिकृत परवानगी नसतानाही नेरूळ चौकातील शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केले. ...सविस्तर बातमी
13:17 (IST) 17 Nov 2025

खबर पीक पाण्याची: साखर धोरणातील गोंधळाचा शेतकऱ्यांवरच परिणाम ?

सहकारी कारखान्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली आहे, हे चित्र थांबवण्यासाठी आणि सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असा सूर साखर उद्योगातून उमटत आहे. ...सविस्तर बातमी
13:10 (IST) 17 Nov 2025

हार नही मानुंगा… कवितेतून व्यक्त झाल्या पंकजा मुंडे

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळासमोर बांधण्यात आलेल्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात रविवारी (१६ नोव्हेंबर) पंकजा मुंडे बोलत होत्या. ...अधिक वाचा
13:03 (IST) 17 Nov 2025

मित्र पक्षाला टांगणीवर ठेवण्याची भाजपची धूर्त खेळी

नागपूर जिल्ह्यात १५ नगरपालिका आणि १२ नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. भाजपने वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी भूमिका घेत युतीसाठी इच्छुक असलेल्या मित्र पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवले. ...सविस्तर बातमी
12:42 (IST) 17 Nov 2025

राजापूर नगर पालिकेसाठी आणलेल्या ईव्हीएमवर आढळले मध्यप्रदेश निवडणूक नाव; जिल्हाधिका-यांकडे तक्रार

महाराष्ट्रातील राजापूर नगर पलिकेची निवडणूक असताना इतर राज्यातून आलेल्या मशीनवर निवडणूक घेणे संशयास्पद आहे. - अजीम जैतापकर, शहराध्यक्ष, काँग्रेस ...अधिक वाचा
12:28 (IST) 17 Nov 2025

डोंबिवली भोपरमधील भूखंड विकासात कर सल्लागाराची ठाण्यातील विकासकाकडून फसवणूक

या फसवणूक प्रकरणी कर सल्लागाराने मानपाडा पोलीस ठाण्यात विकासका विरूध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. ...सविस्तर वाचा
12:28 (IST) 17 Nov 2025

Mumbai CNG Shortage: सीएनजी पुरवठा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे हाल; पंपावर वाहनांच्या रांगा, गॅस नसल्याने गृहीणीही हवालदील

महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबईकरांना बसू लागला आहे. सर्वच सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...सविस्तर वाचा
12:23 (IST) 17 Nov 2025

एमबीबीएस प्रवेशासाठी ३५ लाखांची फसवणूक, चंदीगडमधील आरोपीवर…

मुलाला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने घाटंजीतील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाला तब्बल ३५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...सविस्तर वाचा
12:12 (IST) 17 Nov 2025

शिंदेंचे भाजपविरोधात कलानींना बळ, भाजपचे चार ज्येष्ठ माजी नगरसेवक कलानी गटात दाखल

उल्हासनगरात शिवसेना आणि कलानी गटाची युती आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने भाजपच्या सहा नगरसेवकांना दोनच दिवसात पळवल्याची चर्चा आहे. ...सविस्तर बातमी
12:12 (IST) 17 Nov 2025

मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात, नवनीत राणा म्हणाल्या “चिखलदऱ्याच्या विकासासाठी हेच योग्य उमेदवार”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य अजेंडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ...वाचा सविस्तर
12:12 (IST) 17 Nov 2025

मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात, नवनीत राणा म्हणाल्या “चिखलदऱ्याच्या विकासासाठी हेच योग्य उमेदवार”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य अजेंडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ...वाचा सविस्तर
12:02 (IST) 17 Nov 2025

राज्यातील न्यायालयांमध्ये लवकरच ‘एएलएस’ तंत्रज्ञान, कर्णबधिरांना न्यायालयीन सुनावणीत….

राज्यातील न्यायालयीन प्रणाली अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयासह सर्व जिल्हा न्यायालयात लवकरच विशेष असिस्टिव्ह लिसनिंग सिस्टम (एएलएस) बसवण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
12:01 (IST) 17 Nov 2025

Mumbai Crime News: खारमध्ये परदेशी तरुणीचा विनयभंग; आरोपीला २४ तासात अटक

फ्रान्सची नागरिक असलेली २७ वर्षीय फिर्यादी तरूणी पर्यटनासाठी मुंबईत आली होती. सध्या ती वांद्रे येथे रहात होती. ...सविस्तर वाचा
11:52 (IST) 17 Nov 2025

Vasai Student Death: वसई विद्यार्थीनी मृत्यू प्रकरण : जिल्हा शिक्षण विभागाकडून चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत

वसई पूर्वेत संबंधित शाळा असून, ८ नोव्हेंबर रोजी अनेक विद्यार्थी शाळेत उशिराने आले होते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ...अधिक वाचा
11:47 (IST) 17 Nov 2025

Jalgaon Banana : केळी उत्पादकांसाठी खुशखबर… जळगावात २०० पेक्षा अधिक शीतगृहे उभारण्याच्या हालचाली

जळगावला ‘केळीची राजधानी’ म्हणून ओळख मिळाली आहे. जिल्ह्यात तब्बल ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर वर्षभर केळीची लागवड केली जाते. ...वाचा सविस्तर
11:42 (IST) 17 Nov 2025

Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रात कधी होणार निवडणुका? काय आहे वेळापत्रक? कधी लागणार निकाल? वाचा सर्व माहिती सविस्तर!

Maharashtra local body polls, Maharashtra Local Body Election 2025: राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. ...सविस्तर बातमी
11:36 (IST) 17 Nov 2025

बाळसाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिनी ठाकरे बंधू एकत्र

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाचे इतरही नेते उपस्थित होते.

11:34 (IST) 17 Nov 2025

मेट्रो ९ च्या कामादरम्यान ६५ फुटावरुन पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू; आतापर्यंत सहा जणांचा बळी

शनिवारी सकाळी १० च्या सुमारास साईबाबा नगर येथील मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान सुपरवायझर फरहान तहजीब अहमदने (४२ वर्ष) स्थानकावर एका बाजूला पडलेले लोखंडी पट्ट्या उचलून नेण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. ...वाचा सविस्तर
11:34 (IST) 17 Nov 2025

Nashik kumbh mela : साधुग्रामसाठी झाडे, फांद्यांची छाटणी… नाशिकला जळगावच्या पातळीवर नेणार काय ? पर्यावरणप्रेमी संतप्त

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हरित अर्थात पर्यावरणस्नेही राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वेगळे चित्र समोर येत आहे. ...वाचा सविस्तर
11:16 (IST) 17 Nov 2025

Nashik kumbh mela: सिंहस्थ कुंभमेळा नियोजन शेतकऱ्यांसाठी त्रासदायक…घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्ग चौपदरीकरणास विरोध; महायुतीमध्ये अस्वस्थता

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी घरे, दुकाने, शेतजमीन काढण्याची तयारी असताना इगतपुरी तालुक्यातील घोटी ते त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० चौपदरीकरण करण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
10:34 (IST) 17 Nov 2025

Navi Mumbai CNG Supply Disrupted : सीएनजी पुरवठा ठप्प; नवी मुंबईतील पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

महानगर गॅस लिमिटेड कडून मिळालेल्या माहितीनुसार, GAIL च्या मुख्य गॅस पाइपलाइनला चेंबूर-ट्रॉम्बे परिसरात नुकसान झाल्यामुळे गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. वडाळा येथील ‘सिटी गेट स्टेशन’द्वारे नवी मुंबई-ठाण्यासह मुंबईतील सीएनजी पंपांना गॅस मिळतो. ...वाचा सविस्तर
10:34 (IST) 17 Nov 2025

जैन समाजावर अद्याप कारवाई का नाही? अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मनसेचा सरकारला सवाल

अमित ठाकरे यांनी रविवारी नेरुळ सेक्टर-१ च्या शिवस्मारकातील महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर नेरुळ पोलिसांनी याची गंभीर दखल घेत अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. ...सविस्तर बातमी
10:34 (IST) 17 Nov 2025

Mumbai CNG Shortage : महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये बिघाड; सीएनजी पुरवठा प्रभावित, घरगुती गॅसवर परिणाम नाही

Mumbai CNG Supply Disrupted: महानगर गॅसच्या पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईतील सीएनजीचा पुरवठा बाधीत झाला आहे. त्याचा फटका ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पंपानादेखील बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...अधिक वाचा
10:32 (IST) 17 Nov 2025
Live : महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये बिघाड; मुंबईत सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो. आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाईनमध्ये बिघाड झाल्याने वडाळा येथील महानगर गॅसच्या सिटी गेट स्टेशनला (सीजीएस) होणारा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबई, ठाण्यातील गॅस पुरवठ्यावर बसला आहे. यामुळे शहरातील अनेक सीएनजी पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.