प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लता मंगेशकर साहित्य नगरी उदगीर: खेडय़ातील मराठी शाळा अडचणीत आल्या असून शिक्षणाचा हक्क व्यवस्था हिरावून घेत असल्याची खंत ज्येष्ठ लेखक राजन गवस यांनी व्यक्त केले. विनोद शिरसाट व प्रमोद मुनघाटे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. वैचारिक साहित्याच्या दुष्काळाचे काय, एकेकाळी विचारवंताचा देश होता तो आता भ्रमिष्टांचा म्हणायचा का, असा सवाल उपस्थित करत गवस म्हणाले, की सध्या काही भागात इंग्रजी शाळा हैदोस घालत आहेत. ‘का भुललासी वरलीया रंगा’ अशा अवस्थेत खेडय़ातील माणूस अडकला आहे. त्याला खरा मार्ग दाखवला जात नाही. चांगला शिक्षक मिळतं नाही कारण शिक्षक प्रशिक्षण व्यवस्था नीट विकसित करू शकलो नाही. मराठी शिकवण्याची पद्धत आपण अंमलबजावणी पातळीवर आणली नाही अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. वयाच्या १६ व्या वर्षांपासून कवी, कथा, कादंबरी, समीक्षक, विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता हा प्रवास मुलाखतीतून उलगडला गेला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi schools in the village trouble education being deprived ysh
First published on: 24-04-2022 at 01:34 IST