वाई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई येथील कार्यालयात मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक, विख्यात पंडित, पद्मविभूषण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा ३० वा स्मृतिदिन संपन्न झाला. प्राज्ञपाठशाळामंडळाचे सचिव अनिल जोशी यांच्या हस्ते तर्कतीर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्याव्यासंगी सहायक डॉ. जगतानंद भटकर होते.

याप्रसंगी अनिल जोशी यांनी तर्कतीर्थांच्या आठवणी सांगून ज्ञाननिर्मिती परंपरा हा तर्कतीर्थांचा संपन्न वारसा आपण सर्वांनी जबाबदारीने पुढे नेण्याचे आवाहन केले. तर नवीन पारिभाषिक शब्दांची करून मराठी भाषेला तर्कतीर्थांनी समृद्ध केले, असे डॉ. जगतानंद भटकर यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा-सेल्फीच्या नादात गेला जीव; नवविवाहितेचा किल्ल्याच्या बुरुजावरून पडून मृत्यू

याप्रसंगी विद्याव्यासंगी सहायक आनंद गेडाम, प्रीती साळुंके, रवींद्र घोडराज, संपादकीय सहायक शिल्पा भारस्कर, वर्षा देवरुखकर, सुरेखा मगर, ग्रंथालयीन सहायक मनोज जोशी, सचिन भाडळकर, विनोदिनी शिगवण, वर्षा नाईक आदींसह प्राज्ञपाठशाळेचे कर्मचारी उपस्थित होते. विद्याव्यासंगी सहायक डॉ. स्नेहा खोब्रागडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, विद्याव्यासंगी सहायक सरोजकुमार मिठारी यांनी आभार मानले.