मेळघाटच्या एका बाळाचा कुपोषणाने मृत्यू झाला. यानंतर नागपूरहून त्या बाळाचा मृतदेह मेळघाटला आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून साधी रुग्णवाहिकाही दिली नाही. शेवटी आई-वडिलांना मृत बाळाचा मृतदेह बसमधून आणावा लागला, असा आरोप आहे. यावर ही आरोग्य विभागाची अनास्था नाही का? या विभागावर मंत्र्यांचा वचक नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांना विचारला. यावर लोढा यांनी आपली भूमिका मांडली. ते रविवारी (११ डिसेंबर) अमरावतीत आले असताना माध्यमांशी बोलत होते.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, “या घटनेबाबत नेमकं सत्य काय आहे हे मला माहिती नाही. मात्र, ही घटना दुर्दैवी आहे. मी मुंबईत गेल्यावर आरोग्य मंत्र्यांशी याबाबत बोलेन. आम्ही दोघेही महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय कुपोषणाने बालमृत्यू यावर चर्चा करू. १० दिवसांपूर्वीच आम्ही याच विषयावर एक बैठक घेतली होती.”

“आम्ही त्या विभागाचं आणि या विभागाचं काम आहे असं ढकलणार नाही”

“आम्ही त्या विभागाचं आणि या विभागाचं काम आहे असं ढकलणार नाही. हे सरकारचं काम आहे, सामूहिक काम आहे. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. तुम्हाला पुढील सहा महिन्यात यात सुधारणार दिसेल,” असं आश्वासन मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

व्हिडीओ पाहा :

नेमके आरोप काय?

मेळघाटच्या एका बाळाचं कुपोषण झालं होतं. त्याला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. यानंतर नागपूरहून त्या बाळाचा मृतदेह मेळघाटला आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून साधी रुग्णवाहिकाही दिली नाही.

हेही वाचा : VIDEO: अमरावतीत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “विद्यार्थीनीचं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी आई-वडिलांना मृत बाळाचा मृतदेह बसमधून आणावा लागला, असा आरोप आहे. इतकंच नाही, तर मृत बाळाच्या आई-वडिलांनी माध्यमांना कोणतीही माहिती देऊ नये म्हणून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला. तसेच त्यांना चार ते पाच तास मोबाईल बंद ठेवायला सांगितला, असाही आरोप झाला.