केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पार्टीबाबत केलेलं एक विधान जोरदार चर्चेत आहे. गडकरींनी आता आमचं दुकान चांगलं सुरू आहे, असं वक्तव्य केलं. तसेच सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाही, मात्र, जुने गिऱ्हाईक दिसेना, असं सूचक वक्तव्यही केलं. ते शुक्रवारी (१८ ऑगस्ट) बुलडाणा येथे बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “दुकान चालायला लागतं तेव्हा गिऱ्हाईकांची कमतरता नसते. आता आमचं दुकान चांगलं सुरू आहे. गिऱ्हाईकांची कमी नाही. मात्र, खरे जुने गिऱ्हाईक कुठे दिसेना.”

व्हिडीओ पाहा :

“माझ्यासारख्या लोकांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की…”

“माझ्यासारख्या लोकांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की, आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला तो केवळ आमच्या कर्तुत्वामुळे नाही. असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात आणीबाणीत दोन दोन वर्षे तुरुंगवास सहन केला. अनेक संकटं सहन केली, अनेक आंदोलनं केली. लाठ्या खाल्ल्या. या अनेक लोकांच्या तपश्चर्येतून, बलिदानातून आम्ही सत्तेत पोहचलो आहोत,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : नितीन गडकरींना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाने….”, काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही जरी शिखरावर असलो, तरी या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेतलं नसतं, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिखरावर जाण्याची संधी कधीच मिळाली नसती. म्हणून आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत,” असंही नितीन गडकरींनी नमूद केलं.