राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी राज्यातील पाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. पाणी प्रश्नावर राजकारण होऊ नये, असे म्हणतानाच “मला गुलाबभाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा खातं देवाच्या कृपेनं मिळाल्याचंही ते जळगावमध्ये म्हणाले आहेत. या खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्यास नावलौकिक होईल, असा आशावाद या सभेत बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे.

“त्या ज्येष्ठ नेत्याने पोलीस ठाण्यासमोर झोपणे अयोग्यच”, पालकमंत्री गुलाबराव पाटील स्पष्टच म्हणाले..

नागरिकांनी पाणीपट्टी नियमितरित्या भरली पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. राज्यात सरकारकडून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, या योजनांसाठी बरेचदा नागरिक सहकार्य करत नाहीत, अशी नाराजी यावेळी गुलाबराब पाटलांनी बोलून दाखवली आहे.

“शिंदे गटातील काही आमदार नाराज”; अजित पवारांचं विधान, चंद्रकात पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, “सरकार स्थापनेपासूनच…”

दरम्यान, गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आमदारकीपेक्षा कठिण असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘चून चून के मारेंगे ठाकुर’ अशा पद्धतीचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत असतं, असं त्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. “ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षावर अवलंबून नसते. कार्यकर्ता ज्या विचारांचा असतो, त्या विचारांची ग्रामपंचायत बनते”, असे त्यांनी म्हटले आहे. पहिल्या लाटेत कोणीही आरामात निवडून येतो. पण दुसऱ्या लाटेत जो निवडून येतो, तोच खरा नेता असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.