लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाने घराच्या छतावर नेत चार वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. सूर्य दाखवतो, खाऊ देतो, पैसे देतो, असे सांगत अतिप्रसंग केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल झाला आहे.

शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात चार वर्षे अकरा महिन्यांची मुलगी कुटुंबीयांसमवेत राहते. दरम्यान, संबंधित कुटुंबाच्या शेजारी तेरा वर्षे पाच महिन्यांचा अल्पवयीन मुलगा खेळण्यासाठी आला होता. या वेळी संबंधित चार वर्षीय मुलगी खेळत असताना मुलाने लहान मुलीला तुला सूर्य दाखवतो, खाऊ देतो, असे सांगत गच्चीवर नेले आणि अत्याचार केला.

आणखी वाचा-प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक घोषित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीला रात्री त्रास होऊ लागला. हा अतिप्रसंगाचा प्रकार असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अतिप्रसंग केल्याप्रकरणी तेरावर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नयना कामठे करीत आहेत.