सोलापूर : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या पातळीवर राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका घेत असताना माढा लोकसभा आढावा बैठकीस पक्षाचे माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा करमाळ्याचे अपक्ष.आमदार संजय शिंदे हे दोघेही गैरहजर राहिले. एवढेच नव्हे तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनीही या आढावा बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षीय स्तरावर लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी माढा, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, धाराशिव, बीड, परभणी, नाशिक, हिंगोली आदी लोकसभा मतदारसंघांचा पक्षीय आढावा घेण्यात आला. परंतु यात माढा लोकसभा आढावा बैठक सुरू झाली असता माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू, करमाळ्याचे राष्ट्रवादी सहयोगी सदस्य अपक्ष आमदार संजय शिंदे या दोघांची अनुपस्थिती जाणवली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हेसुध्दा गैरहजर राहिले. मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, माजी आमदार दीपक साळुंखे, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आदींनी या बैठकीत हजेरी लावून माढा लोकसभा जागेसंबंधीची माहिती पुरविली. मात्र मोहोळ मतदारसंघाचा भाग माढ्याऐवजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित आहे.

ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Yashwant Sena, Sanjay Kshirsagar
मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी
vikas Thackeray
गडकरींच्या विरुद्ध लढणारे ठाकरे पवारांच्या भेटीला
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे अपक्ष.आमदार असलेले त्यांचे बंधू संजय शिंदे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्या निकटच्या नातेवाईकाचा विवाह सोहळा असल्यामुळे आपण पक्षाच्या लोकसभा आढावा बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. आमदार शिंदे बंधुंशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.