गेल्या वर्षी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह राणा दाम्पत्याने धरला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली. अशातच आता खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ६ एप्रिलला सामूहिक हनुमान चालीसा पाठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या हनुमान चालिसाचा आवाज उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानापर्यंत गेला पाहिजे, असं आमदार रवी राण यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवी राणा म्हणाले, “हनुमान चालिसाचं पठण करतो म्हटलं, तरी उद्धव ठाकरेंनी अहंकारातून चौदा दिवस जेलमध्ये टाकलं. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसाला विरोध केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण, ४० आमदार आणि मुख्यमंत्रीपद गेलं. त्यांचं पूर्ण सामाज्र नेस्तानाबूत झालं.”

हेही वाचा : “ना हार की फिकर करते है, ना…”, ‘जय श्रीराम’ म्हणत नवनीत राणांचा बुलेटवरील व्हिडीओ व्हायरल

“हनुमान जयंतीनिमित्त नवनीत राणांचा वाढदिवस आहे. अयोध्या, दिल्ली, मुंबई, अमरावतीत हनुमान चालिसाचं सामूहिक पठण ठेवण्यात आलं आहे. या हनुमान चालिसाचा आवाज उद्धव ठाकरेंचं ‘मातोश्री’ निवासस्थान आणि त्यांच्या कानापर्यंत पोहचला पाहिजेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जो अहंकार आहे, ते त्यातून बाहेर पडतील,” अशी टीका रवी राणांनी केली आहे.

हेही वाचा : “…तर मग आता मलाही काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागेल”; वसंत मोरेंच्या नाराजीची चर्चा; कसब्यातील एका बॅनरवरून फुटलं वादाला तोंड!

“मागच्या वर्षी हनुमानाचे नाव घेणं म्हणजे देशद्रोह झाला होता. आम्हाला चौदा दिवस जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. पण, आता हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आलं आहे. सध्या हनुमानाचे नाव घेतल्याने देशद्रोह दाखल होईल, अशी भिती नाही. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत तर एकनाथ शिंदे आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या घरात हनुमान चालिसाचं पठण करावे. कारण, अति केलं की माती होते,” असं टीकास्र नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर डागलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla ravi rana attacks uddhav thackeray over hanuman chalisa row ssa
First published on: 30-03-2023 at 19:06 IST