काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेमंधी हाय, या वाक्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील महाराष्ट्रभर व्हायरल झाले. हा डायलॉग इतका व्हायरल झाला, की यावर गाणंही बनलं आहे. शहाजी पाटलांच्या या गुणाचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील कौतुक केलं होतं. शिंदे आणि फडणवीसांची सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी आयोजित सत्कार समारंभात काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओके हाय म्हणतं शहाजी बापूंनी डायलॉगबाजी केली.

महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
arun dudwadkar
कोल्हापूरातील दोन्ही मतदारसंघ ठाकरे सेनेकडे; अरुण दुधवडकर यांच्या दाव्याने संभ्रम
Bhavana Gawali on yavatmal loksabha constituency
“मैं मेरी झांसी नहीं दूंगी”, भावना गवळी लोकसभा उमेदवारीसाठी ठाम; म्हणाल्या, “१३ खासदार शिंदेंबरोबर गेलो तेव्हा…”
water shortage in Pune
लोकजागर : पाणीकपात करा…

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातले वातावरण ढवळून निघाले होते. काल विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले. शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सगळे बंडखोर आमदार आता आपआपल्या मतदार संघात परतताना दिसत आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील सुद्धा आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी भाषणात शहाजीबापूंनी तुफान डायलॉगबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एवढंच नाही तर मी शिवसेनेचा आहे. भगवा माझा आहे असंही शहाजी बापू म्हणाले. शहाजी बापूंच्या या विधानांने चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

अडीच वर्षात उद्धव ठाकरेंसोबत केवळ २ वेळा भेट झाली. ठाकरेंनी एकदाही विकासकामांची विचारणा केली नाही, असा अरोप पाटील यांनी केला. करोना काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे घरात बसत होते. मात्र, अजित पवार आढावा घेण्यासाठी सकाळी सहा वाजता बाहेर पडायचे, असंही शहाजी पाटील म्हणाले. एवढचं नाही माझ्यासमोर भारतातील लष्कर जरी उभे केले, तरी माझ्यावर दबाब पडणार नाही, असंही मी एकनाथ शिंदेंना सांगितलं असल्याचे शहाजी पाटील म्हणाले.