कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांचा स्वॅब तपासणी अहवाल करोनाबाधित आला आहे. ते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभव नाईक हे शिवसेनेचे आमदार असून त्यांचा सोमवारी सकाळी घशाचा  स्वॅब घेतला गेला. हा अहवाल करोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे.

आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रवास केला आहे . त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत नाईक यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येत आहे. याच पाश्र्वभूमीवर मालवण शहरातील २० व्यक्तींची करोना रॅपिड टेस्ट मंगळवारी  ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आली. यात शिवसेना पदाधिकारी, एक महिला अधिकारी, २ पत्रकार व मत्स्य विक्रेत्या महिलांचा समावेश असून सर्वाचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक बालाजी पाटील यांनी दिली.

आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १५ जुलैपासून आमदार नाईक यांच्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या आहेत. त्यांनी करोना टेस्ट करावी.असे आवाहन करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla vaibhav naik infected with corona abn
First published on: 22-07-2020 at 01:26 IST