गडचिरोली : नक्षलवादग्रस्त आदिवासी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून ४५७ पैकी ३३३ गावांत विविध कामे सुरू आहेत. याठिकाणी ७८ हजार २३७ मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याच्या यादीत गडचिरोली राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. करोना संक्रमण काळात एकीकडे लोकांच्या हाताला रोजगार नसताना या जिल्ह्यात स्थानिक आदिवासींना २६५ दिवस काम मिळवून दिल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

करोनाकाळात अनेक ठिकाणी मजुरांना रोजगारासाठी फिरावे लागले. स्थलांतरावरती बंधने आल्यानंतर जिल्ह्यातच मनरेगातून मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील कित्येक मजूर सीमालगत असलेल्या इतर राज्यात मोलमजुरीसाठी जातात. मात्र आता नरेगातून मोठय़ा प्रमाणात कामे होत असल्याने आपल्या गावातच किंवा जवळ रोजगार उपलब्ध होत असल्याने मजूर मनरेगाला पसंती देत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांत १२८३ एवढी कामे सुरू आहेत. राज्य शासनाच्या सूचनांनुसार प्रत्येक मजुराला किमान २६५ दिवसाचे काम मनरेगातून मिळवून देण्यासाठी नियोजन केले जाते. उर्वरित ग्रामपंचायतीसह सुरू गावातही अनेक कामांची सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे मजुरांचा हा आकडा अजून वाढणार असल्याचे संबंधित विभागाकडून कळवण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात मजगी, घरकुल बांधकामे, गुरांचे गोठे, पांदण रस्ते, बोडी, सिंचन विहीर, सिमेंट बंधारे, फळबाग लागवडीसह इतर कामे सुरू आहेत. प्रशासनाकडून शहराकडे व इतर जिल्ह्यात राज्यात होणारे स्थलांतर कमी करून जिल्ह्यातच मजुरांना रोजगार मिळवून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात सर्वात जास्त मजूर संख्या असून दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तालुक्याचा आहे. विशेष म्हणजे, करोनाच्या संकटात सलग दोन वर्षांपासून या जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातून कामे घेतली जात असून त्याचा थेट फायदा मजुरांना होताना दिसत आहे.

Mumbai, Overcrowding ,
मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी
Nashik, Fraud with grape producers,
नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी
Cyber ​​criminals, Jalgaon
सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

 भटकंती थांबणार

 गडचिरोली हा नक्षलवादग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे बहुसंख्य मजूर मिरची, धान तथा कापूस वेचण्यासाठी लगतच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा तथा विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात जातात. सहा सहा महिने तिथे मुक्कामी राहून कामे करतात. त्याच बळावर घर चालते. उन्हाळय़ात तेंदूपत्ता वेचणीच्या हंगामात जंगलात तेंदूचा आधार घेतात. मात्र आता मनरेगाच्या माध्यमातून आदिवासींच्या हाताला काम मिळत आहे. 

नक्षलवादग्रस्त या जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही, स्थानिक राजकीय नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी उद्योग सुरू करण्याच्या मोठमोठय़ा घोषणा केल्या. मात्र या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. उद्योगविरहित जिल्हा असल्यामुळेच येथे मजूर अधिक असले तरी आजवर या मजुरांच्या हाताला काम नव्हते.

तालुकानिहाय कामे व मजूर संख्या

धानोरा : १६७ कामे, १३ हजार ८२१ मजूर

गडचिरोली : १०३ कामे, १३ हजार ५२८ मजूर

चामोर्शी : १४९ कामे, ११ हजार ३५९ मजूर

आरमोरी : १९४ कामे, ११ हजार १८४ मजूर

कुरखेडा : १३३ कामे, ९ हजार २३५ मजूर

कोरची : ७७ कामे, ६ हजार ३०३ मजूर

देसाईगंज : ८१ कामे, ४ हजार ९९५ मजूर

मुलचेरा : ८१ कामे, ३ हजार ६३६ मजूर

एटापल्ली : ८४ कामे, १ हजार ७०३ मजूर

अहेरी : ८६ कामे, ९९५ मजूर

भामरागड : ३८ कामे, ८६९ मजूर

सिरोंचा : ९० कामे, ६०९ मजूर

गडचिरोली जिल्ह्यात मनरेगातून कामे घेण्यास मोठा वाव आहे. प्रत्येकाला काम मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करत आहे. मागेल त्याला मनरेगातून रोजगार मिळवून देण्यात येत आहे. मजुरांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून कामे मिळवावीत.

– माणिक चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा, जिल्हा परिषद.