महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा देउन बाहेर पडलेले युवा कार्यकर्ते आशिष कोरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात झालेल्या समारंंभात कोरी यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
हेही वाचा- “महाराष्ट्रात वातावरण इतकं पेटलं आहे की आज निवडणूक…” आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
कोरी गेली पंधरा वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जिल्हा सचिव म्हणून कार्यरत होते. मराठी अस्मितेसाठी स्थापन झालेल्या मनसेची वैचारिक भूमिका बदलू लागल्यानंतर कोरी यांनी युवा नेते अमित ठाकरे यांची सांगली दौर्यामध्ये भेट घेउन पक्षाची बदलती भूमिका हिंदूत्ववादी असून यामुळे या पक्षात काम करणे अशयय असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. दोनच दिवसांनी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आपली राजकीय वाटचाल पुढे चालू ठेवण्याचे संकेत दिले.
हेही वाचा- हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार, शैलेश टिळक यांची घेतली भेट
पुण्यामध्ये झालेल्या एका समारंभात प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी कोरी यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करीत असताना पक्षामध्ये काम करण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी कोरी यांनी पटोले यांना भारतीय संविधानाची प्रस्ताविका भेट दिली. असून या पक्ष प्रवेशावेळी आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, पक्षाचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार पुणे शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे, सातार्याचे विराज शिंदे आदी उपस्थित होते.