आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात सर्वच पक्षांनी कंबर कसलेली असताना आघाड्या आणि जागावाटपासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात मनसेची नेमकी काय भूमिका असणार आहे? याविषयी अद्याप तर्क-वितर्क लावले जात आहेत. मनसेच्या नेत्यांकडून राज ठाकरेच अंतिम निर्णय घेतील, असं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये झालेल्या मनसेच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरेंनी सर्वच पक्षांवर टीका केली. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या त्या त्या काळातील सरकारांवर त्यांनी हल्लाबोल केला. त्याचवेळी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

“जेव्हा मी एखादी गोष्ट बोलतो, तुम्ही त्यावर रिअॅक्ट होता, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही असं तुम्हाला वाटतंय का? ते व्यवस्थित पोहोचतंय. मी फिरत असताना अनेक माता-भगिनी माझे हात धरून सांगतात, ‘आता बाबारे विश्वास तुझ्यावरच आहे’. तो विश्वास टिकवणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. बाकीच्यांनी तो विश्वास घालवला आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मी गाडीतून उतरतो आणि मागे आरारारारा…”, राज ठाकरेंची सोशल मीडियावर टिप्पणी; कार्यकर्त्यांचे टोचले कान!

“सगळे तुम्हाला मूर्ख बनवत आहेत”

“ज्या प्रकारचं राजकारण सध्या चालू आहे.. कोण कुठे आहे हेच कळत नाहीये. कुणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे तो? मला नाट्य संमेलनात पाच नगरसेवक भेटायला आले. म्हणाले, ‘नमस्कार, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक आहोत’. पण कुणाचे? तर तीन म्हणाले ‘आम्ही शरद पवारांचे’, दोन बोलले ‘आम्ही अजित पवारांचे’. पण आले होते एकत्र. माझं अजूनही ठाम मत आहे की सगळे आतून एकच आहे. फक्त तुम्हाला येडे बनवत आहेत. मूर्ख बनवत आहेत. यांचं आपापसांत राजकारण चालू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होत आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली.

“महाराष्ट्र एकसंघ राहू नये, यासाठी जातीचं विष पसरवलं जात आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्यासमोर मी सांगितलं होतं की हे होणार नाही. पण होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाही. तांत्रिकदृष्ट्या ते होऊ शकत नाही. मागे सगळे मोर्चे निघाले होते. सगळे मुंबईत आले वगैरे. पण पुढे काय झालं? माझी मराठा बांधवांना विनंती आहे की यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही, याची हे आश्वासनं देत आहेत”, असंही राज ठाकरे म्हणाले.

‘दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरण्यातला आनंद मला नको’, राज ठाकरेंची भाजपावर अप्रत्यक्ष टीका …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी…”

“आज विषय मुलांच्या नोकऱ्यांचा, शिक्षणाचा आहे. बाहेरच्या राज्यांमधले लोक आम्ही पोसायचे आणि आमच्याकडची मुलं आंदोलन करणार? जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला शिक्षण व रोजगार देणं महाराष्ट्राला सहज शक्य आहे. पण महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी विष कालवायला हे बसलेच आहेत”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकीय नेतेमंडळींवर टीकास्र सोडलं.