शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुलुंडमधील प्रबोधन यात्रेच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेवर बोचरी टीका केली आहे. राजू पाटील यांनी सुषमा अंधारेंना सुशी ताई म्हटलं आणि ‘वरचा मजला रिकामा’ या मराठी वाक्प्रचाराचा वापर करत टीका केली. त्यांनी शनिवारी (३ डिसेंबर) ट्वीट करत ही टीका केली. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हे ट्वीट रिट्वीट करण्यात आलं आहे.

राजू पाटील म्हणाले, “मराठीत ‘वरचा मजला रिकामा’ असा वाक्प्रचार आहे,परंतु आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या ‘वरच्या मजल्यावर’ घनदाट ‘अंधार’ आहे.”

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
sunil tatkare and ajit pawar devendra fadnavis morning oath
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आम्ही दोन्ही…”
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत

“त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात”

“आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात,” अशी टीका राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.

सुषमा अंधारे राज ठाकरेंविषयी काय म्हणाल्या होत्या?

सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात.”

हेही वाचा : “दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

“मी मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटरही होईन”

“दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली.

“मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात”

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं.”

“मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा”

“ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही,” असं अंधारे यांनी म्हटलं.

हेही वाचा : सुषमा अंधारेंवर विभक्त पतीचे गंभीर आरोप, म्हणाले, “एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य…”

“आता उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास”

“आता मतदार नसलेल्या सेनेचा उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास झाला आहे. अशी परिस्थिती होऊनही त्यांना बोलावंसं वाटतं,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.