अमरावती महापालिके वर ‘मनसे’ची धडक, प्रवेशद्वाराची तोडफोड

गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती महापालिका क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

अमरावती महापालिके समोर आंदोलन करताना मनसेचे कार्यकर्ते.

अमरावती : शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, साफसफाईकडे दुर्लक्ष या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापालिके च्या कार्यालयात ठिय्या आंदोलन के ले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रवेशद्धाराची तोडफोड देखील के ली. मनसेचे महानगरअध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती महापालिका क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस असतानाही महापालिका प्रशासनाचे स्वच्छता, साफसफाई अशा गंभीर विषयाकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. शहरात रोगराई वाढत आहे त्याचप्रमाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डय़ांचे साम्राज्य झाले आहे. नवीन रस्ते तयार करणे तर दूरच परंतु पावसाळ्याचे दिवस बघता रस्त्यांची डागडूजी देखील के ली जात नाही, त्याचप्रमाणे अनेक भागात दिवाबत्तीची सुद्धा व्यवस्था नाही. गाजर गवत मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. कुठलीही तणनाशक फवारणी महापालिके च्या वतीने के ली जात नाही. या सर्व प्रश्नांवर मनसेने वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, परंतु कुठलेही सकारात्मक पाऊल महापालिके च्या वतीने उचलण्यात येत नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन के ले, अशी माहिती संतोष बद्रे यांनी दिली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाच्या प्रवेशद्वाराची तोडफोड के ली. महापौर, महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी साफसफाई तसेच खड्डय़ांच्या प्रश्नावर संपूर्ण शहरात स्वत: फिरून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी महानगराध्यक्ष संतोष बद्रे, शहराध्यक्ष गौरव बांधत, जनहित कक्ष शहर संघटक प्रवीण डांगे, महिला जिल्हाध्यक्ष मीना जुनघरे, शहराध्यक्ष वृंदा मुक्तेवार, बबलू आठवले, विक्की थेटे, हर्षल ठाकरे, सचिन बावणेर, सुरेश चव्हाण, नितेश शर्मा, अजय महल्ले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns workers protesting in front of amravati municipal corporation zws

ताज्या बातम्या