पुणे : राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली, तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम आहे. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी आज ५ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर वारा वाहण्याचाही अंदाज आहे. ६ ऑगस्टनंतर कोकणात सर्वच ठिकाणी पाऊस कमी होईल. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात काही ठिकाणी आणखी एक दिवस मुसळधार पाऊस असेल. त्यानंतर या भागासह सर्वच राज्यांत केवळ तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या पावसाची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे जिल्ह्यात सकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील घाट क्षेत्रात जिल्ह्यातील घाट भागात जोरदार पाऊस झाला. शहरात सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. उद्या सकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहील.

हंगामातील पहिल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. जुलैमधील पावसाने कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. या दोन्ही विभागांमध्ये अनेक ठिकाणी पहिल्या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातच काही ठिकाणी पाऊस सरासरी पूर्ण करू शकला नाही. हंगामाच्या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत कोकण, पश्चिाम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार, तर राज्यात इतरत्र सर्वसाधारण पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज असला, तरी पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण घटणार असल्याचे दिसून येते आहे.

बहुतांश भागात सध्या पावसाची विश्रांती

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणखी एक ते दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. ६ ऑगस्टनंतर सर्वच ठिकाणी पाऊस कमी होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश भागात पावसाची विश्रांती असेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moderate rainfall persists in some parts konkan and western maharashtra srk
First published on: 05-08-2021 at 11:52 IST