मिरजेच्या वखार भागात राहणा-या विवाहित तरुणीने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला कृष्णा नदीत फेकून जीवे मारण्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी कृष्णाघाटावर घडला. नागरिकांनी सदर महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले असून, वैद्यकीय उपचारासाठी तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वखार भागात राहणा-या धनश्री राजेंद्र देशमुख (२५) ही विवाहित तरुणी शुक्रवारी दुपारी कृष्णाघाट येथे आपल्या आठ महिन्यांच्या मुलीसह गेली होती. नदीकाठाने फिरत असताना तिने आपल्या जवळ असणा-या मुलीला नदीत फेकले. ही घटना पाहणा-या लोकांनी बालकाला वाचविण्यासाठी नदीत उडय़ा मारल्या. मात्र लहान मुलीचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. या घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिली.
पोलीस येईपर्यंत सदर तरुणीला अटकाव करण्याचा प्रयत्न नागरिक करीत होते. मुलीला अन्य लोकांनीच नदीत टाकल्याचा आरोप ही तरुणी करीत होती. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले असून वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची मानसिक स्थिती अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले. या मागील नेमके कारण पोलीस शोधत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2014 रोजी प्रकाशित
मुलीला कृष्णा नदीत फेकणा-या आईला अटक
मिरजेच्या वखार भागात राहणा-या विवाहित तरुणीने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला कृष्णा नदीत फेकून जीवे मारण्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी कृष्णाघाटावर घडला.
First published on: 05-07-2014 at 03:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother arrested who thrown girl in krishna river