वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ आपल्यापर्यंत आला असून पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. दरम्यान व्हिडीओत महिला आपल्या जीवाला धोका असून येथून घेऊन चला अशी विनंती रुपाली चाकणकर यांना करत आहे. या प्रकरणावर खासदार रामदास तडस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मागील वर्षी २० जून २०२० ला पंकज या माझ्या मुलाला संपत्तीतून बेदखल केलं होतं. त्यानंतर तो वर्ध्याला घर घेऊन राहायला लागला. त्याने पूजा नावाच्या मुलीसोबत ऑक्टोबरमध्ये लग्न केलं. त्यावेळेस आमच्या घरतल्या कुणालाच काहीही माहिती नव्हतं. लग्नाच्या वेळी मुलीचे जावई आणि बहीण हेच होते आणि त्यांनी ते लग्न केलं. लग्न केल्यानंतर दोघे जण फ्लॅटवर राहायला लागले. पंकज आणि पूजा एक दिवस माझ्याकडे आले. बाबा म्हणे आम्ही लग्न केलं. मी त्यांना सांगितलं, तुम्ही लग्न केलं चांगलं झालं. तुम्ही दोघं सुखानं राहा. तुम्हाला घरी यायची इच्छा असेल, तर या. तुमच्यासाठी आमचं घर खुलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा यांनी आरोप केला की त्या सुरक्षित नाहीत. कुटुंबापासून धोका आहे. ते आमच्यासोबत राहातच नाही. आता राजकारणासाठी राजकारण करायचं. भाजपाच्या लोकांवर बेछुट आरोप करायचे. मी खासदार आहे. माझी पत्नी नगराध्यक्ष राहिली आहे. माझी मुलगी ग्रामपंचायत सदस्य आहे. आमचं राजकारण कसं संपवायचं. या दृष्टीनं विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे.” असा आरोप खासदार रामदास तडस यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

व्हिडीओत काय आहे –
१२ सेकंदाच्या या व्हिडीओत दिसणारी महिला सांगत आहे की, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे येथे, मॅडम प्लीज मला येथून घेऊन चला. मी विनंती करते”.

“माझ्या जीवाला धोका,” भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेवर अत्याचार; रुपाली चाकणकरांनी ट्वीट केला व्हिडीओ

कडक कारवाईची मागणी
रुपाली चाकणकर यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “रामदास तडस यांचे कुटुंबीय, मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून महिलेला मारहाण करत असून प्रचंड मानसिक त्रास दिला जात आहे. महिलेची अवस्था फार वाईट असून खूप घाबरले

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp ramdas tadas clarification on daughter in law alleges assault rmt
First published on: 08-09-2021 at 18:05 IST