एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांना अलीबाबा आणि चालीस चोर असं म्हटलं जातं. अशा चोरांच्या हाती कुठलीही संसदीय लोकशाहीची कुठलीही सूत्रं असू नयेत असं राज्याला वाटतं आहे. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा चोरांसाठीच आहे असं म्हणत कोल्हापुरात संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच मी चोर मंडळ म्हटलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. माझ्या विरोधात जी समिती नेमली जाते आहे त्या समितीला अभ्यास करू द्या काही मदत लागली तर मी जरूर करेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आपण जी संसदीय लोकशाहीची पद्धत स्वीकारली आहे त्यामध्ये विरोधकांचं स्थान उच्च आहे. पंडित नेहरू ते मनमनोहन सिंह यांच्यापर्यंत प्रत्येकाने विरोधकांचा आवाज ऐकला आहे. जेव्हा हा आवाज दडपला जातो तेव्हा जनता त्या सरकारला उत्तर दिलं आहे हा इतिहासही आपल्याला ठाऊक आहे असंही संजय राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री विरोधकांना जे देशद्रोही म्हणाले ते आत्ता ज्या संगतीत वावरत आहेत त्याचा परिणाम आहे. सुसंगत सोडून त्यांनी कुसंगत धरली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज यांचेही चांगले संबंध आहेत. मी आज कोल्हापूरला आलो आहे म्हटल्यावर त्यांची भेट घेणारच होतो ती आज घेतली. विविध विषयांवर आम्ही संवाद साधला अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.

सध्या शिवसेनेसोबत जे काही घडलं आहे त्यात सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आशेचा किरण आमच्यासाठी आहे. देशासाठी आहे, कारण सर्वोच्च न्यायालय हेच एक मंदिर आता आम्ही मानतो इतर मंदिरांमध्ये चप्पल चोरांची गर्दीच जास्त झाली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२४ ला सर्वांचा हिशोब चुकता करू. गद्दारांनी आम्हाला धडे देऊ नयेत. येणाऱ्या काळात गद्दाराच्या राजकीय अंतयात्रा निघणार आहेत. सत्य काय आहे ते २०२४ ला दाखवू हा संदेश महाराष्ट्राला कोल्हापूरकरांचा पोहोचला पाहिजेत. झडलेल्या झाडाची फुले पडली आहेत. आता नव्याने पुन्हा पालवी येऊन फुले डोलणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.