शिवसेना नेत्यांना धमकी देण्याच्या प्रकरणामध्ये वाढ झाली आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांना काही दिवसांपुर्वी फोनवरुन धमकी देण्यात आल्यानंतर आता खासदार विनायक राऊत यांना देखील धमकी दिली गेली आहे. एकाच दिवसात तब्बत १५ वेळा फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो राणे समर्थक असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

“सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालानंतर भाजपा आणि नारायण राणे यांच्या ताब्यात असलेल्या जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीला बहुमत मिळाले आहे. सातत्याने राणे समर्थक असल्याचे सांगून एक व्यक्ती फोन करुन शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देत होता. एकाच दिवसात १५ वेळा फोन करुन धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांना तात्काळ दखल घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे गाव हे रत्नागिरीत असून सध्या तो मुंबईत वास्तव्यास  आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे,” असे विनायक राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. या संदर्भात आम्ही सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत असतो. ते ठेकेदारांना आदेश देतात पण ते ठेकेदार काम सुरु करत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी आदेश देऊनसुद्धा अद्याप काम सुरु झाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते २७ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करणार आहे,” असे विनायक राऊत यांनी सांगितले.