महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा आगामी होणाऱ्या वर्णनात्मक परीक्षेला विरोध असून जुन्याच पॅटर्ननुसार वस्तुनिष्ठ ‘बहुपर्यायी’ परीक्षा पद्धती कायम करण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा आंदोलन करणार असल्याचा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. सन २०२२ मध्ये चंद्रकांत दळवी समितीने पारंपारिक वर्णनात्मक परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा योजना जाहीर केली.

हेही वाचा >>> Samruddhi Mahamarg : अपघात की घातपात? समृद्धी महामार्गावर अचानक पंक्चर झाली ५० वाहने

या पारंपारिक वर्णनात्मक परीक्षा पध्दतीला राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा विरोध असून पूर्वीप्रमाणेचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच परीक्षा घेण्याची जोरदार मागणी केली जात आहे. चंद्रकांत दळवी समितीने २०२५ पासून वर्णनात्मक परीक्षा लागू होणार असल्याचे सांगितले. या पारंपारिक वर्णनात्मक परीक्षा पध्दतीने निकाल लागण्यास विलंब होत आहे. तसेच गुणदान पद्धतीने भेदभाव होऊ शकतो. हा राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांवर एकप्रकारे अप्रत्यक्षणे अन्याय होत आहे, असे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती विद्यार्थी प्रतिनिधी पंकज मोरे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होत आहे.