वाधवान बंधूंचा अंतरिम जामीन कोर्टाने फेटाळला आहे. DHFL चे प्रमोटर कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना अंतरिम जामीन नाकारण्यात आला आहे. या दोघांच्या सीबीआय कोठडीत ४ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाधवान बंधूंना त्यांच्या महाबळेश्वर येथील बंगल्यातून रविवारी अटक करण्यात आली होती. ANI ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

राज्यात करोनामुळे लॉकडाउनची कडक अमलबजावणी केली जात असताना डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांचं प्रकरण समोर आलं होतं. राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचं शिफारस पत्र घेऊन वाधवान यांच्या कुटुंबीयांसह २३ जण लॉकडाउनच्या काळात प्रवास करून महाबळेश्वरला गेले. तेथे पाचगणी पोलिसांनी या सगळ्यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.