मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बुधवारी झालेल्या चर्चेनंतर राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याची घोषणा केली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत उपस्थित होते. दोन हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यासाठी अनुदान, अनुकंपा धर्तीवर नियुक्त्या, २४ वर्षे आश्वासित प्रगती योजना अशा मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात योग्य त्या सूचना विभागाला देण्यात येतील, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jul 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बुधवारी झालेल्या चर्चेनंतर राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याची घोषणा केली.

First published on: 23-07-2014 at 07:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal council employee withdrawn their strike