सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य मंडळांनी गेल्या चार दिवसांपासून महाप्रसादाचा धडाका लावला आहे. महाप्रसादामध्ये शिरा-भाताबरोबरच पुरी बासुंदीचा बेतही काही मंडळांकडून आयोजित करण्यात आल्याने यंदाच्या गणेशोत्सवात सामान्यांना मेजवानीचा आनंद मिळाला असला, तरी निवडणुकीत मंगलमूर्ती कोणाला पावणार याची उत्सुकता अन्नदात्याबरोबर कार्यकर्त्यांना लागली आहे. यंदा महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून सढळ हस्ते योगदान दिले जात असल्याने महाप्रसादाचा बेतही खासा करण्यात येत आहे.
गणेशोत्सवात पाचवा दिवस झाल्यानंतर अनेक मंडळांकडून सत्यनारायणाची पूजा करून प्रसाद वाटप केले जात होते. आता मात्र, या निमित्ताने महाप्रसाद म्हणून जेवणच देण्यात येत आहे. यंदा महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून सढळ हस्ते योगदान दिले जात असल्याने महाप्रसादाचा बेतही खासा करण्यात येत आहे. मंडळाच्या आर्थिक ताकदीनुसार शिरा, मसाला भात, वांग्याची अथवा बटाट्याची भाजी हा सर्वसामान्य बेत मानला जात आहे. यंदा मात्र, शिरा करत असतानाही त्यामध्ये काजू, बदाम, बेदाणे यांचा मुक्तहस्ते वापर केल्याचे आढळून आले. तसेच मसाला भातही बासमती तांदळाचा करण्यात आला आहे.
काही मंडळांनी यंदा शिरा, भाताला फाटा देत थेट जिलेबी, पुरी-बासुंदीचा बेत केला आहे. याचबरोबर पुरीसोबत साधी बटाटा भाजी न करता पनीर कुर्माही समाविष्ट करण्यात आला होता. या निमित्ताने सामान्यांना महाप्रसादाऐवजी मेजवानीच मिळाल्याचा आनंद झाला. महाप्रसादासाठी देणगीदार असलेल्यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात येत आहे. रस्त्यावरच महाप्रसाद वाटप होत असल्याने अनेक रस्ते दुपारपासून सायंकाळपर्यंत रहदारीसाठी बंद करण्यात आले.
या निमित्ताने आचारी मंडळींनी सांगितले, की एका मंडळाकडे सुमारे दोन ते तीन हजार लोकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. शिरा, भात, आमटी, भाजीसाठी पानाला ५० ते ६० रुपये खर्च येतो. तर, पनीर कुर्मा, बासुंदी, पुरी, मसाले भात या जेवणासाठी १५० ते १८० रुपये खर्च येतो. आचाऱ्याला प्रत्येक पानासाठी १५ रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत मेहनताना मिळतो. वाढपी न वापरता मंडळाचे कार्यकर्तेच टेबल मांडून बफे पद्धतीने वाढप्याचे काम करतात.
यंदा महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून सढळ हस्ते योगदान दिले जात असल्याने महाप्रसादाचा बेतही खासा करण्यात येत आहे. मंडळाच्या आर्थिक ताकदीनुसार शिरा, मसाला भात, वांग्याची अथवा बटाट्याची भाजी हा सर्वसामान्य बेत मानला जात आहे. यंदा मात्र, शिरा करत असतानाही त्यामध्ये काजू, बदाम, बेदाणे यांचा मुक्तहस्ते वापर केल्याचे आढळून आले. तसेच मसाला भातही बासमती तांदळाचा करण्यात आला आहे.