वाई : ज्यांना जनतेने आधीच पालिकेच्या राजकारणातून निवृत्त केले आहे त्यांनी सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी असले चोंबडे सल्ले देऊ नयेत असे जोरदार प्रत्युत्तर खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा उदयनराजेंनी पत्रकातून जोरदार प्रतिउत्तर दिले. त्यांनी म्हटले की, आमदारांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन धंदा निश्चित सुरू करावा. ज्यांना जनतेने आधीच नगरपालिकेतून निवृत्त केले आहे, त्यांनी असले सल्ले देऊ नयेत. प्रशासकीय राजवट पालिकेत लागून एक वर्ष होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकरिता सातारा विकास आघाडी काहीच करत नाही, अशी बोंब मारणारेच ज्यावेळी कास जलपूजन केले, त्यावेळी सातारा विकास आघाडीचा काय संबंध अशी गरळ ओकत होते . प्रशासकीय राजवटीमध्ये नागरिकांची कामे होत नाहीत असे त्यांचे अप्रत्यक्ष म्हणणे म्हणजे नथीतून तीर मारण्याचा प्रकार आहे. दोन्ही डगरीवर हात ठेवणारे आमदार सैरभैर झाले आहेत. कुरतडलेली दाढी आणि भुरकट मिशांवर ताव देण्यापेक्षा कोणाला आलिंगन देणे केव्हाही चांगले. यांच्यासारखे पोटात एक आणि ओठात एक असे आमचे तरी नाही, असा टोला उदयनराजेंनी लगावला. निष्ठा दाखवायला लागत नाही तर, ती आपोआप प्रदर्शित होते. आपण भाजपमध्ये असताना सुमारे अडीच वर्ष कोणाची टीमकी वाजवली हे जनतेला माहित आहे. आता तुमची निष्ठेची नाटके सुरू झाली आहेत. आम्ही भाजपमध्ये जाणार याची काणकुण लागताच यांनी भाजपला जवळ केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal politics should not give advice udayanaraje reply to shivendrasin raje ysh
First published on: 19-11-2022 at 00:09 IST