अलिबाग- अनैतिक संबधातून रायगड जिल्ह्यातल्या वडखळ येथील लॉजवर एकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्याचे गुप्तांग कापून डोळ्यावर ठेवले आणि आरोपी पसार झाले. मात्र पोलीसांनी तपासाची चक्र फिरवली आणि पाच तासात आरोपी जेरबंद झाले.वडखळ नाका येथे राहणाऱ्या धमेंद्र कुशवाह या ४० वर्षीय पुरूषाचा मृतदेह वडखळ येथील सावली लॉज बुधवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास येथे आढळून आला. अज्ञात मारेकरांनी धारदार शस्त्राने गळा कापून तसेच गुप्तांग कापून निघृण हत्या केली होती. या प्रकरणी वडखळ  पोलीस ठाण्यात  भा.दं.वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी या प्रकरणाचा सखोल आणि समांतर तपास सुरू करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के यांनी पथकासह घटनास्थळी पहाणी केली आणि तपासालासुरूवात केली.ही हत्या सावली लॉज खोली नं.११५ मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे लॉज मध्ये आलेल्या आणि बाहेर गेलेल्या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलीसांनी काही संशयित आरोपी निश्चित केले. त्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर आणि लोकेशन शोधून त्यांचे लोकेशन प्राप्त केले. पण आरोपींनी मोबाईल फोन बंद केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीसांनी खबऱ्या मार्फत आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा हे संशयित आरोपी खाजगी वाहनाने वडखळ येथून पेण कडे पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली.

हेही वाचा >>>शरद पवार गटाकडून तीव्र निदर्शने, राष्ट्रवादी काँग्रेस भवनावरील चिन्ह हटविले

या माहितीनंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे आणखिन तीन अधिकाऱ्यांना तपासासाठी बोलावून घेतले. आणि पेण कडून पनवेल कडे जाणा-या महामार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली. पण याची कुणकूण लागल्याने आरोपींनी गाडी सोडून एस टी महामंडळाच्या बसने पनवेलकडे प्रवास सुरू केला. पण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गाठलेच. बस अडवून त्यांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. सुरूवातीला आरोपींनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पण पोलीसी हिसका दाखवताच त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला. आणि गुन्हा केल्यानंतर उत्तरप्रदेश व झारखंड येथे पळून जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगीतले. 

हेही वाचा >>>‘मार्ड’चा संप मागे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निर्णय

अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या महिलेचे आरोपी पैकी एकाशी प्रेम संबंध होते. तर मयत धर्मेंद्र याच्याशी अनैतिक संबंध होते. यातून आरोपी आणि मृत धर्मेंद्र यांच्यात भांडणही झाले होते. यातूनच धर्मेंद्रचा काटा काढण्याचा निर्णय महिला आणि तीच्या प्रियकराने घेतला होता. धर्मेंद्रची हत्या करण्यासाठी एक चाकू खरेदी केला. नंतर त्याला सावली लॉजवर बोलावले. त्याला शरीरसंबंध करण्याचे अमिष दाखवले. धर्मेंद्र कुशवाह आणि सदर महिला रुमवर पोहोचताच महिलेचा प्रियकर आणि त्याचा सहकारी रुमवर पोहोचले. तिघांनी धर्मेंद्र याचे तोंड दाबून त्याचा गळा कापला. नंतर लिंग कापले आणि ते त्याच्या डोळ्यावर ठेवल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे,  स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे ,पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोह अमोल हंबीर, पोह प्रतिक सावंत, पोना सचिन वावेकर ,पोशि ईश्वर लांबोटे, तसेच  सायबर पोलिस ठाणेतील, पोना तुषार घरत, पोना, अक्षय पाटील या गून्हयाचे तपासात महत्वाची भूमिका बजावली.