भाजपातून काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमदेवारी जाहीर झाली आहे. ते आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या असून नानांना आशीर्वाद दिला आहे. नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला, असे नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढले पाहिजे. माझा आशीर्वाद त्यांना आहे, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले हे एकेकाळी नितीन गडकरी यांचे सहकारी होती. मधल्या काळात भाजपाबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आता त्यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात उमदेवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या. ते पूर्वीही माझे मित्र होते आणि आताही माझे मित्र आहेत, असेही त्यांनी म्हटले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My blessings with nana patole says bjp leader nitin gadkari lok sabha
First published on: 14-03-2019 at 13:03 IST