यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये सोमवारी पार पडलेल्या विषय समितींच्या निवडीत महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी बाजी मारली. महागाव आणि मारेगाव नगर पंचायतीत भाजपला संधी मिळाली. अनेक असंतुष्टांना स्वीकृत सदस्यपदी निवडून सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. ही निवडप्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत चालली.

कळंब नगर पंचायतीत योगेश धांदे, मारोती वानखडे, आकाश कुटेमाटे, मंजूषा विधाते, माला सुरदुसे यांची सभापतीपदी निवड झाली. काँग्रेसकडून राजेश भोयर, शिवसेनेकडून राजेश मांडवकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. महागाव नगर पंचायतीत गजानन साबळे, सुरेश नरवाडे, प्रमोद भरवाडे यांची सभापतीपदी निवड झाली. संभाजीराव नरवाडे, सुजित ठाकूर या दोघांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. मारेगाव नगरपंचायतीत चारही सभापतीपदाची माळ अनपेक्षितपणे भाजप नगरसेवकांच्या गळय़ात पडली. त्यात हर्षां महाकुलकर, राहुल राठोड, वैभव पवार, सुशीला भादीकर यांचा समावेश आहे. स्वीकृत नगरसेवक पदी शंकर मडावी हे बिनविरोध व राजू ठेंगणे ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले.

Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
mla raju awale marathi news, sangli congress marathi news
सांगलीतील नाराजीचा हातकणंगलेत परिणाम नाही; ‘मविआ’च्या नेत्यांचा निर्वाळा
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा
Sushilkumar Shinde
सुशीलकुमार शिंदे यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशेब द्यावा, आमदार राम सातपुते यांचे आव्हान

झरी नगरपंचायतीत संगीता किनाके, दिनेश जयस्वाल, संतोष मंचलवार, ज्ञानेश्वर कोडापे, सुनीता नखाते यांची निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून कालिदास अर्के आणि वामन भोंग यांची निवड झाली. बाभूळगाव नगरपंचायतीत सर्व सभापतीपद महाविकास आघाडीकडे आले. यात शेख कादर शेख रहमान, अमर ऊर्फ रूपेश शिरसाट, मदिना परवीन शब्बीर खान, श्याम शिवशंकर जगताप, रेणुका सोयाम, मंदाकिनी मोते यांचा समावेश आहे. स्वीकृत सदस्य म्हणून सुरेश वर्मा व अभय तातेड यांची निवड झाली. राळेगाव नगरपंचायतीत जानराव गिरी, संतोष कोकुलवार, मोहिनी बोबडे, कुंदन कांबळे यांची सभापतीपदी निवड झाली. नंदकुमार गांधी व मधुकर राजुरकर यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली.