काँग्रेसमध्ये विजयाची रेलचेल सुरु झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणूका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. भाजपाच्या ताब्यातील जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्नाकडे केंद्रातील मोदी सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

तांबे प्रकरणात ‘एबी फॉर्म’चा काय घोळ झाला होता? असा प्रश्न विचारल्यावर नाना पटोले म्हणाले, “१० जानेवारील प्रदेश नागपूरला प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली होती. तेव्हा संघटना सचिवांना एबी फॉर्म देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार फॉर्म देण्यात आला होता; पण तो नागपूरचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ तारखेला बाळासाहेब थोरातांचे जवळील व्यक्ती मनोज शर्मांकडे दुसरा फॉर्म पोहचवण्यात आला.”

हेही वाचा : “ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढणार”, म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आपली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मग, सुधीर तांबेंनी उमेदवारी दाखल करायला हवी होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी सांगितलं, सत्यजीत तांबेंचं नाव लिहलं नसल्याने आम्ही अर्ज दाखल केला नाही. परंतु, चुका होताच आणि झाल्या आहेत. वेळेवर दुरुस्त केल्यावर त्याला चुक म्हणत नाही. पण, हा कुटुंबाचा वाद आहे. कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये, याची काळजी सर्वांना घेतली पाहिजे,” असा सल्ला नाना पटोलेंनी दिला आहे.